Toyota Car : ईस्ट और वेस्ट टोयोटाची ‘ही’ कार इज द बेस्ट… कॉन्सेप्टमध्ये असतानाच जिंकली मनं
इटलीतील मिलानमध्ये ऑटो अँड डिझाईन मॅग्झीनतर्फे आयोजीत अवॉर्ड सेरेमनीमध्ये टोयोटा कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्ही कॉन्सेप्टने 2022 कार डिझाईन अवॉर्ड जिंकला आहे. टोयोटा कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्ही एक ऑफ रोड रेट्रो स्टाइल इलेक्ट्रिक एसयुव्ही कॉन्सेप्ट आहे.
मुंबई : टोयोटाने (Toyota) सर्व इलेक्ट्रिक कॉन्सेप्टला मागे टाकत जगातील सर्वाधिक सवोत्कृष्ठ कार डिझाईनचा किताब मिळविला आहे. इटलीतील मिलानमध्ये ऑटो अँड डिझाईन मॅग्झीनतर्फे आयोजीत अवॉर्ड सेरेमनीमध्ये टोयोटा कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्ही (Toyota Compact Cruiser EV) कॉन्सेप्टने 2022 कार डिझाईन अवॉर्ड जिंकला आहे. टोयोटा कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्ही एक ऑफ रोड रेट्रो स्टाइल इलेक्ट्रिक एसयुव्ही कॉन्सेप्ट (EV Concept) आहे. या कारने ऑडी स्काईस्फीयर, पोर्श मिशन आर, वोल्वो कॉन्सेप्ट रिचार्ज, पोलस्टार 02, लेक्सस इलेक्ट्रिफाइड स्पोर्ट, आईडी अल्पाइन A4810 सारखे फाइनलिस्टविरुध्द हा अवॉर्ड जिंकला आहे. या लेखातून टोयोटा कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्ही कॉन्सेप्टच्या डिझाईनबाबत अधिक माहिती घेणार आहोत.
कॉम्पॅक्ट क्रुझर ईवीची डिझाईन
कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्हीला फ्रांसच्या नीसमध्ये टोयोटा युरोप डिझाईन डेव्हलपमेंट सेंटरतर्फे बनविण्यात आले आहे. दरम्यान अद्याप ही कारची केवळ कॉन्सेप्ट असून याचे प्रोडक्शन अद्याप सुरु झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्हीची डिझाईन टोयोटाच्या प्रसिध्द लँड क्रुझरच्या फर्स्ट जनरेशन मॉडलच्या धर्तीवर तयार करण्यात आले असून याचे डिझाईन 2006 च्य एफजे क्रुझरच्या आठवणीलाही ताजे करते.
काय असणार स्पेसिफिकेशन्स
टोयोटा कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्हीची टेक्निकल माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार, या अपकमिंग कारला टोयोटाच्या TNGA प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक व्हर्जनवर तयार केले जाउ शकते. जर असे झाले तर ही कार मोठ्या bZ4x SUV सारखी असेल. ग्राहकांना यामध्ये स्टँडर्ड म्हणून ऑल व्हील ड्राईव्हसोबत एक ड्युअल मोटर सेटअप मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे फीचर्स
रेट्रो थीमला समोर ठेवत कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्हीमध्ये हॉरिजान्टल एलईडी हेडलाइट्सने वेढलेल्या सेंटरमध्ये टोयोटा लेटरिंगसह एक ग्रील मिळणार आहे. अशी रचना कारला J80 लँड क्रुझर स्टाइलच्या रुपामध्ये दाखवते. कॉम्पॅक्ट क्रुझर ईव्ही कॉन्सेप्टचा मोठा फ्रंट बंपर याला ऑफ रोड एसयुव्हीच्या पर्यायासह ग्राहकांना उपलब्ध होतो. याचे बोनट चौडे आणि बिल्कुल फ्लॅट दिसून येतात.
केव्हा सुरु होईल प्रोडक्शन
सध्या चर्चा होत असलेली कार अद्याप कॉन्सेप्टवर आधारीत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये टोयोटा कॉम्पेक्ट क्रुझर ईव्हीच्या प्रोडक्शनला सुरुवात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच्या टायरला लावण्यात आलेले रेट्रो स्टाइल असलेले व्हील या प्रोडक्टला कूल टच देतात. लाँच झाल्यावर कॉम्पेक्ट क्रुझर ईव्ही ग्लोबल मार्केटमध्ये फोर्ड ब्रोंको स्पोर्ट आणि नेक्स्ट जेन जीप रेनेगेडसाठी इलेक्ट्रिक प्रतिस्पर्धी सिध्द होउ शकते.