मुंबई : मारुती सुझुकी भारतामध्ये या वर्षीच्या तीन मोठे लाँच करणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. भारतात सर्वात मोठा मार्केट शेअर मारुती सुझुकीचा आहे. कंपनीच्या सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल कार्सला चांगली मागणी आहे. आता नवीन माहितीनुसार, कंपनी या वर्षाच्या शेवटापर्यंत मारुती सुझुकी बलेनोला (Maruti Suzuki Baleno) सीएनजी व्हेरिएंटमध्ये (CNG variant) लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या व्हेरिएंटमध्ये काही बदलदेखील करण्यात आलेले आहेत. या लाँचमध्ये मारुती सुझुकीची बजेट हॅचबॅक कार मारुती अल्टोचाही (New Maruti Alto) समावेश असणार आहे. या सर्व कारला नवीन लूकमध्ये सादर करण्यात येणार आहे.