उत्तम कार ड्रायव्हिंगसाठी ‘या’ टॉप अॅक्सेसरीज ठरतील महत्वपूर्ण… प्रवास होईल सुखकर…
ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये कारच्या अनेक खास अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. त्यांच्या वापरामुळे कारचा प्रवास आनंददायी आणि आरामदायी होतो. कारच्या सीटशी संबंधित अनेक अॅक्सेसरीज आहेत महत्वपूर्ण भूमिका निभावतात. लांबच्या प्रवासासाठी हे साहित्य महत्वपूर्ण ठरत असतात. या लेखातून आपण टॉप 10 अॅक्सेसरीजची माहिती घेणार आहोत.
कोरोनानंतर आपल्यातील प्रत्येकाला कारचे महत्व कळू लागले आहे. ज्या वेळी सर्वत्र सार्वजनिक वाहतूक (Public transport) कोलमडली होती; त्या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी आपल्या कारचा वापर केला. लांबवरच्या प्रवासासाठी नागरिक आपआपल्या कार्सला प्राधान्य देत असतात. कारने प्रवास करणे सोयीस्कर व आरामदायी ठरत असते. चांगला प्रवास व्हावा, यासाठी गाडीच्या रचनेत काहीसा बदल करावा लागत असतो. अनेक अशा कार अॅक्सेसरीज (Car Accessories) बाजारात मिळतात, ज्यामुळे कारचा प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर (Comfort) होतो. काहींमुळे कारच्या लूकमध्ये भर पडते.
1) कार कोट हँगर्स : ऑफिससाठी किंवा काही वेगळ्या प्रसंगी कोट घालणाऱ्या लोकांसाठी या अॅक्सेसरीजचा खूप उपयोग होतो. कोट हॅन्गरवर तुमचा कोट टांगून तुम्ही त्याचा लाभ घेउ शकतात.
2) डॉग नेट : जर तुम्हाला पाळीव कुत्र्यांसह प्रवास करण्याचा असेल, तर ही अॅक्सेसरी तुमच्यासाठी आहे. डॉग नेट समोरच्या आणि दुसऱ्या सीटच्या रोमध्ये डिव्हायडेशन तयार करते. यामुळे पेट पुढच्या सीटवर येउ शकत नाही.
3) कार बीड सीट्स : कारमधून प्रवास करताना लोक थकतात. अशा स्थितीत बीड सीट्स अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे गाडीतील प्रवाशांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरणही चांगले होते.
4) कूलिंग सीट : अनेक नवीन कार हवेशीर सीट्सह येतात, परंतु जुन्या कारमध्येही कूलिंग सीट बसवता येते. यामुळे कारचे सीट गार राहते.
5) नेक कुशन : ही कारमधील अत्यावश्यक अॅक्सेसरी आहे. सीटवर बसल्यानंतर मानेच्या मागे राहिलेली जागा त्या माध्यमातून भरुन निघते. यामुळे ड्रायव्हिंगची स्थिती चांगली राहते.
6) कार सीट बॅक सपोर्ट : या अॅक्सेसरीजमुळे ड्रायव्हरच्या पाठीमागे असलेली पोकळी भरुन निघते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळतो.
7) सीट बॅक ऑर्गनायझर : कारमध्ये सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी बॅक ऑर्गनायझरचा वापर केला जातो. सीट बॅक ऑर्गनायझरमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही सामान ठेवू शकता
8) सीट नेक पिलो : ज्यांना कारमध्ये खूप झोप येते त्यांच्यासाठी ही अॅक्सेसरी खूप खास आहे. सीट नेक पिलोमुळे, एखादी व्यक्ती आपले डोके एका जागी ठेवून आराम करु शकते.
9) इन्फ्लेटेबल मॅट्रेस : या अॅक्सेसरीज तुमच्या कारच्या मागील सीटला बेडरूममध्ये बदलता येते. लांबच्या प्रवासासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते.
10) सीट कुशन : इतर पिलो आणि अॅक्सेसरीज प्रमाणे, सीट कुशन अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे कारचा लूकही अधिक आकर्षक होतो.