या दोन स्वस्तातील कारनी चाहत्यांचा केला हिरमोड, सेफ्टीत झाल्या फेल, खरेदीपू्र्वी पाहा

व्हेईकल सेफ्टी टेस्टींग प्लॅटफॉर्म ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅमने ( NCAP) मंगळवारी भारतातील 2023 चे पहिल्या क्रॅश टेस्टचे रिझल्ट जाहीर केले आहेत.

या दोन स्वस्तातील कारनी चाहत्यांचा केला हिरमोड, सेफ्टीत झाल्या फेल, खरेदीपू्र्वी पाहा
CAR SAFETY TESTImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 8:21 PM

मुंबई : रस्ते अपघाताच्या वाढत्या प्रमाणामुळे आता जादा एअर बॅग्स असलेल्या सुरक्षित कारची मागणी बाजारात वाढली आहे. त्यामुळे कार खरेदी करताना सेफ्टी रेटींग पाहून ग्राहक आपल्या पसंदीची कार निवडत आहेत. देशातील कार निर्मितीचा सर्वात मोठ्या मारूती ब्रॅंडच्या ग्राहकांना एका बातमीमुळे जबर फटका बसला आहे. मारूती कंपनीच्या अनेक कार बेस्ट सेलिंगच्या यादीत आहेत. ग्लोबल एनकॅपच्या (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये मारूतीच्या दोन स्वस्त कारना फेल ठरविल्याने या कारच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

व्हेईकल सेफ्टी टेस्टींग प्लॅटफॉर्म ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅमने ( NCAP) मंगळवारी भारतातील साल 2023 साठीचे पहिल्या क्रॅश टेस्टचे रिझल्ट जारी केले आहेत. यातील निष्कर्षाने मारूती सुझुकीच्या ग्राहकांना निराश व्हावे लागले आहे. या कार क्रॅश टेस्टमध्ये मारूती कंपनीच्या दोन स्वस्तातील पॉप्युलर गाड्यांना फेल केले आहे. या कार क्रॅश चाचणीत वॅगनआर आणि अल्टो K10 या दोन कारची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मारूती सुझुकी ऑल्टो K10 ला वयस्क प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ 2 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी झिरो स्टार मिळाला आहे. तर स्वस्त आणि मस्त कार असलेल्या मारूतीच्या वॅननआर कारला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक स्टार रेटींग आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी झीरो स्टार मिळाला आहे.

वॅगनआरची किंमत आणि सेफ्टी फीचर्स

सर्व सामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मारूती कंपनीच्या वॅनरआर कारची किंमत 5.53 लाख रूपयांपासून 7.41 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. मारूतीच्या या कारमध्ये एक 1 लीटर पेट्रोल इंजिन आणि दुसरी 1.2 लीटर पेट्रोल इंजन मध्ये येते. ही कार फॅक्ट्री फिटेड सीएनजी किटमध्येही मिळत असल्याने तिची लोकप्रियता प्रचंड आहे. वॅगनआर डुएल फ्रंट एयरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि हिल-होल्ड असिस्ट सारखे सेफ्टी फिचर्स असल्याचा दावा कंपनी करीत असते. पण ते कुचकामी ठरले आहेत. ही मारूतीची सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे.

ऑल्टोचे सेफ्टी फीचर्स आणि किंमत

मारूती ऑल्टो K10 ला गेल्यावर्षी नव्या रूपात लॉंच केले होते. कंपनीने अनेक सेफ्टी फिचर्स दिले होते. ऑल्टो K10 ची सेफ्टी रेटिंग वॅगनआरच्या तुलनेत 1 स्टार अधिक मिळाला आहे. पॅसेजर सेफ्टीकरीता तिने ठीकठाक कामगिरी केली. भारतात ऑल्टो K10ची किंमत 3.99 लाख रुपयापासून ते 5.95 लाख रुपयापर्यंत एक्स-शोरूम आहे. ऑल्टो 800 नंतर ही मारूती कंपनीची सर्वात स्वस्तातील कार आहे. सेफ्टीसाठी कारमध्ये डुएल एयरबॅग्स, ईबीडी सह एबीएस आणि रियर पार्किंग सेंसर सारखे फीचर्स आहेत.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.