मुंबई : जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा (toyota) किर्लोस्करनं त्यांच्या दोन लोकप्रिय कार अर्बन क्रूजर (toyota urban cruiser) आणि ग्लान्झा (toyota glanza) या दोन्ही कारच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कारच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कारच्या किंमती किती वाढणार याबाबत अद्याप तरी काही कळू शकलेलं नाही. कंपनीने देखील याचा काही खुलासा केलेला नाही. टोयोटा क्रूजर आणि ग्लान्झा दोन्ही जागतिक बाजारपेठेत टोयोटा आणि सुझुकी ब्रँड्समध्ये भागीदारी म्हणून विकल्या जातात. अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या मारुती विटारा ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि प्रीमियम हॅचबॅक बलेनोच्या रिबॅज केलेल्या आवृत्या आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवरही होऊ शकतो. महागाईचा लोकांच्या वाहन खरेदीच्या निर्णयावर तसेच कारच्या वाढत्या किंमतीवर परिणाम होत असतो. कोरोनापासून ऑटो उद्योग रुळावर येत आहे. त्याच्या वाहन उद्योगांवर आणखी परिणाम होऊ शकतो.
कच्चा मालाच्या वाढत्या किंमतीमुळे कार बनवण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. तो खर्च भरून काढण्यासाठी ही दरवाढ कंपनीकडून केली जातेय. कंपनीकडून असं सांगण्यात आलं की, ग्राहकांचा विचार करून आणि त्यांच्याशी असलेल्या बांधिलकीमुळे एकूण दरवाढ कमी करण्यात आली आहे.
टोयोटा हे भारतातील एकमेव असं उत्पादन आहे की ज्यांनी कारच्या किंमती कोरोनाकाळात वाढवण्याची घोषणा केली. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि चिपचा तुटवडा यामुळे इतर अनेक कारच्या ब्रँडनेही त्यांच्या संबंधित वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला महिंद्रा सुझुकी, टोयोटा, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या अनेक वाहन निर्मात्यांनी अशाच कारणांसाठी त्यांच्या मॉडेल लाइनअपवर किंमती वाढवण्याची घोषणा केलीय.
टोयोयाने कंपनीच्या स्थापनेपासून वीस लाख कारचे उत्पादन आणि विक्री करण्याचा टप्पा गाठण्याची घोषणा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ऑटोमेकरने गुरुवारी जाहीर केले की ग्लान्झा हे ब्रँड भारतात विकले जाणारे दोन लाखावे मॉडेल आहे.