Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric scooter : डिस्पॅचची नवी इलेक्ट्रिक स्कूटर पाहिली का..? लूक अन्‌ डिझाइन लावेल वेड

EV स्टार्टअप डिस्पॅचने (Dispatch) केलेल्या घोषणेनुसार ते 2023च्या पहिल्या तिमाहीत जगातील पहिला ‘पर्पज बिल्ट’ इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बाजारात आणणार आहे. हे संपूर्ण मटेरियल पूर्णपणे भारतात तयार केले जाणार असून कंपनी आपले हे प्रोडक्ट जागतिक बाजारात देखील उपलब्ध करtन देणार आहे. ही एक मॉड्यूलर स्कूटर असेल जी ग्राहकाच्या गरजेनुसार वापरण्यास सोयीस्कर ठरणार आहे. डिस्पॅच इलेक्ट्रिक […]

Electric scooter : डिस्पॅचची नवी इलेक्ट्रिक स्कूटर पाहिली का..? लूक अन्‌ डिझाइन लावेल वेड
डिस्पॅच इलेक्ट्रिक स्कूटर (File photo)
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 4:54 PM

EV स्टार्टअप डिस्पॅचने (Dispatch) केलेल्या घोषणेनुसार ते 2023च्या पहिल्या तिमाहीत जगातील पहिला ‘पर्पज बिल्ट’ इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बाजारात आणणार आहे. हे संपूर्ण मटेरियल पूर्णपणे भारतात तयार केले जाणार असून कंपनी आपले हे प्रोडक्ट जागतिक बाजारात देखील उपलब्ध करtन देणार आहे. ही एक मॉड्यूलर स्कूटर असेल जी ग्राहकाच्या गरजेनुसार वापरण्यास सोयीस्कर ठरणार आहे. डिस्पॅच इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग आणि व्यावसायिक वापरासाठी डिझाइन (Design) केली असून कंपनीच्या दाव्यानुसार, ती एक किफायतशीर, अधिक विश्वासार्ह, अर्गोनॉमिक, कनेक्टेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. या लेखात या स्कूटरबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

चांगली सेवा देण्याचे कंपनीचे धोरण

डिस्पॅचने यांत्रिक भाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवरट्रेन घटकांसह सर्व महत्त्वपूर्ण घटकांसाठी टियर-1 सप्लाय चेन निर्माण केली आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरच्या गुणवत्तेची जवळपास वर्षभर चाचणी करत आहे. दरवर्षी 6 मिलियन स्कूटर तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या वाहन निर्मात्यांसोबत कंपनीने पार्टनरशिप केली आहे. व्यावसायिक वापरासाठी तयार करण्यात आलेल्या या स्कूटरसह, सध्याच्या उत्पादनांपेक्षा बाजारपेठेत चांगली सेवा देण्याचे कंपनीचे धोरण आहे.

100 टक्के माल वाहतूक

डिस्पॅच व्हेइकल्सचे उद्दिष्ट आहे, की 2030पर्यंत फ्लीट मालकांना त्यांच्या ताफ्यात 100 टक्के माल वाहून नेण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना सक्षम करणे, सध्याच्या पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकी वाहनांच्या वापराच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने परवडत असल्याने लोकांचा त्याच्या खरेदीकडे कल वाढला आहे. लोकांच्या गरजेनुसार स्कूटरमध्ये बदल करणे, जास्तीत जास्त शेअरिक व सामान वाहून नेता येईल अशा पद्धतीने स्कूटरची बनावट करणे आदी ध्येय ठरविण्यात आली आहेत.

जागतिक स्तरावर आयपी नोंदणी

डिस्पॅच व्हेइकल्सचे सीईओ आणि सहसंस्थापक रजित आर्य म्हणाले, की सध्या फ्लीट ऑपरेटर वैयक्तिक मालकीसाठी डिझाइन केलेल्या वाहनांमध्ये अडकले आहे. तसेच ही समस्या सरळ पद्धतीने गिग इकॉनॉमी वर्कर्स आणि फ्लीटच्या कमाई, क्षमता आणि अनुभव यांच्यावर प्रभाव निर्माण करणारी ठरत आहे. पुढे बोलताना आर्य म्हणाले, की डिस्पॅच ई-स्कूटरसह लास्ट माइल मोबिलिटीसाठी फ्लीट डायनॅमिक्समध्ये परिवर्तन करण्याची योजना आखली जात आहे. यामुळे ते अधिक फायदेशीर होईल. विशेष म्हणजे, डिस्पॅचने जागतिक स्तरावर विविध आयपी नोंदणी केले आहे, ज्यात 32पेक्षा जास्त देशांमध्ये आयपी नियुक्त केले आहेत.

आणखी वाचा :

KTM ने भारतात लाँच केली सायकल; किंमत हिरो स्प्लेंडरच्या बरोबरीची! जाणून घ्या, असे काय आहे विशेष..

Mahindra EV : महिंद्राची ‘ही’ इलेक्ट्रिक बजेट कार लवकरच होणार लाँच, काय आहे किंमत?

Maruti Car : पेट्रोल-डिझेल, सीएनजी नाही तर…‘या’वर चालेल मारुतीची नवीन कार

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.