3 सेकंदात 100 किमीचा वेग, फॉर्च्यूनरपेक्षा महागडी सुपर बाईक

BMW M 1000 RR | या बाईकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. कारण पण तसेच आहे. ही सुपर बाईक ऑडी, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनरपेक्षा पण महाग आहे. ही बाईक 3 सेकंदात 100 किमी वेगाने धावते. या बाईकची किंमत तर आलिशान कार पेक्षा पण जास्त आहे. ही बाईक एखाद्या रेसिंग बाईक सारखी दिसते.

3 सेकंदात 100 किमीचा वेग, फॉर्च्यूनरपेक्षा महागडी सुपर बाईक
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 4:02 PM

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : बीएमडब्ल्यूने सुपर बाईक प्रेमींसाठी आनंदवार्ता आणली आहे. कंपनीने भारतात त्यांची सर्वात महागडी बाईक BMW M 1000 RR चे वितरण, विक्री सुरु केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात महाग दुचाकी आहे. आलिशान कारपेक्षा पण या बाईकची किंमत अधिक आहे. ही सुपर बाईक ऑडी, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनरपेक्षा पण महाग आहे. कंपनीने या बाईकचे दोन स्टँडर्ड व्हर्जन बाजारात उतरवले आहे. एका बाईकची किंमत 49 लाख रुपये (एक्स-शोरूम) तर दुसऱ्या बाईकची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

महागड्या कारपेक्षा अधिक किंमत

ही बाईक टोयोटाच्या फॉर्च्युनर एसयुव्ही पेक्षा पण अधिक महाग आहे. भारतात टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेलची किंमत 51.44 लाख रुपये आहे. बीएमडब्ल्यूची ही बाईक S 1000 RR आधारीत स्पोर्ट्स बाईक आहे. कंपनीने ही बाईक अनेक अपडेट आणि डिझाईनमधील बदल केल्यानंतर बाजारात उतरवली आहे. BMW M 1000 RR पूर्णपणे एखाद्या रेसिंग बाईकसारखी दिसते.

हे सुद्धा वाचा

999cc चे दमदार इंजिन

BMW M 1000 RR या बाईकमध्ये कंपनीने 999cc का इनलाइन, 4-सिलेंडर पॉवरफुल इंजिन बसवलेले आहे. ही बाईक 211 बीएचपी पॉवर आणि 113 एनएमचे टॉर्क जनरेट करते. बीएमडब्ल्यूची ही बाईक 6 स्पीड गिअरबॉक्ससह येते. गिअरशिफ्टिंग सहज होण्यासाठी बाईकमध्ये बाय डायरेक्शनल क्विकशिफ्टर पण देण्यात आले आहे.

फीचर्स पण जोरदार

या सुपर बाईकमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, स्लाईड कंट्रोल, 7 राईड मोड, लॉन्च कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्टीअरिंग स्टेब्लाईजर, क्रूज कंट्रोल ड्राप सेंसर आणि हिल स्टार्ट सारखे अनेक फीचर्स यामध्ये देण्यात आले आहे.

या बाईकशी थेट पंगा

हार्डवेअरचा विचार करता, बाईकमध्ये युएसडी फ्रंट फोर्क, मोनोशॉक रिअर सस्पेंशन, फ्रंट व्हीलवर 320 एमएमचे ड्युअल डिस्क आणि रिअरमध्ये 220 एमएमचे रिअर डिस्क ब्रेक मिळतात. बाईकचा टॉप स्पीड 306 किलोमीटर प्रति तास आहे. ही बाईक केवळ 3.1 सेंकदात 0 से 100 किलोमीटर प्रति तासचा वेग गाठते. बीएमडब्ल्यूची ही एक खास प्रकारची आहे. भारतात तिचा सामना Ducati Panigale V4R या बाईकशी आहे. या बाईकची किंमत 70 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.