या इलेक्ट्रिक सायकल होत आहे इ-बाइकशी तुलना, किंमतही अगदी खिशाला परवडणारी
दोन्ही सायकल्सना सिंगल लेव्हल पेडल असिस्ट आणि थ्रॉटल मोड देखील मिळतात, जे रायडर्सना विविध सुविधा पुरवण्यासाठी काम करतात. याशिवाय, इलेक्ट्रिक सायकलमध्ये 1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देखील प्रदान करण्यात आला आहे, जो रायडरला रिअल-टाइम माहिती प्रदान करतो.
मुंबई : हरियाणातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक व्हरचुस मोटर्सने 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Alpha A आणि Alpha I या दोन इलेक्ट्रिक सायकल्स (Electric cycle) लाँच केल्या आहेत. लगे हाथ कंपनीने या सायकल्सवर विशेष सवलतही दिली आहे. कंपनी 24,999 रुपये किंमतीची सायकल पहिल्या 50 ग्राहकांसाठी 15,999 रुपये, पुढील 100 ग्राहकांसाठी रुपये 17,999 आणि उर्वरित ग्राहकांसाठी रुपये 19,999 मध्ये विकणार आहे. इंधनाच्या किंमती वाढल्याने आणि अनेकांनी फिटनेससाठी सायकलींगचा पर्याय निवडल्याने सायकल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग उपलब्ध आहे.
इलेक्ट्रिक सायकल पॉवर पॅक
दोन्ही E सायकल (अल्फा A आणि अल्फा) इलेक्ट्रिक सायकलमध्ये 8.0Ah क्षमतेचा एक निश्चित बॅटरी पॅक आहे, जो त्यास उर्जा देतो. याशिवाय फ्रंट सस्पेन्शन, डिस्क ब्रेक, सिंगल-स्पीड डिझाइन यासारखे अनेक फिचर्स दोन्ही सायकल्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच, 250W हब मोटर यामध्ये उपलब्ध आहे. दोन्ही सायकल्सना सिंगल लेव्हल पेडल असिस्ट आणि थ्रॉटल मोड देखील मिळतात, जे रायडर्सना विविध सुविधा पुरवण्यासाठी काम करतात. याशिवाय, इलेक्ट्रिक सायकलमध्ये 1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देखील प्रदान करण्यात आला आहे, जो रायडरला रिअल-टाइम माहिती प्रदान करतो.
इलेक्ट्रिक सायकलचा वेग आणि श्रेणी
थ्रॉटलचा वापर करून, ही सायकल ३० किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याचा टॉप-स्पीड 25 किमी/तास आहे, तर पॅडल चालू असताना श्रेणी 60 किमीपर्यंत वाढते. सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, ज्याची अनेक कारणे आहेत. मात्र पेट्रोलचे वाढलेले दर आणि या वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाची होणारी हानी ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे लोक आता ईव्हीकडे वळू लागले आहेत. त्यामुळेच आता अनेक सायकल कंपन्याही या शर्यतीत सामील होत असून सायकलचे विद्युतीकरण करण्यात गुंतलेले आहेत. जेणेकरुन ज्यांना इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर परवडत नाही ते कमी अंतरासाठी सहज सायकल विकत घेवू शकतील.