काय सांगता… एनर्जिकाची ‘ही’ इलेक्ट्रिक बाइक देईल तब्बल 420 किमीची रेंज…

अपकमिंग बाइक आकर्षक लूक आणि डिझाईनसह बाजारात दाखल होणार आहे. या बाइकच्या परफॉर्मेंसबाबत बोलायचे झाल्यास एक्सपीरिया बाइक सिटी रेंजमध्ये 420 किमीपर्यंत रेंज देईल, असा दावा करण्यात येत आहे. या बाइकच्या जबरदस्त रेंजच रहस्य म्हणजे, या बाइकची बॅटरी आहे.

काय सांगता... एनर्जिकाची ‘ही’ इलेक्ट्रिक बाइक देईल तब्बल 420 किमीची रेंज...
एनर्जिकाची ‘ही’ इलेक्ट्रिक बाइक देईल तब्बल 420 किमीची रेंजImage Credit source: (Image Google)
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 11:50 AM

इटलीच्या टू-व्हीलर निर्माता एनर्जिका (Energica) कंपनीने एक जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक (Electric bike) मार्केटमध्ये आणली आहे. कंपनीने मुगेलो मोटोजीपीमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक एक्सपीरियावरचा सस्पेंस हटवला आहे. ही बाइक आकर्षक लूक आणि डिझाईनसह बाजारात दाखल झाली आहे. या बाइकच्या परफॉर्मेंसबाबत बोलायचे झाल्यास एक्सपीरिया बाइक सिटी रेंजमध्ये 420 किमीपर्यंत रेंज देईल, असा दावा करण्यात येत आहे. या बाइकच्या जबरदस्त रेंजच रहस्य म्हणजे, या बाइकची बॅटरी आहे. एक्सपीरियामध्ये 22.5 kWh ची लिथिअम पॉलिमर बॅटरी पॅक (Battery pack) लावण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, या बाइकमध्ये आतापर्यंतच्या सर्व बाइकच्या तुलनेत मोठा बॅटरी पॅक लावण्यात आलेला असल्याचा दावा केला जात आहे. या एनर्जिकाच्या इलेक्ट्रिक बाइकच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिक माहिती घेणार आहोत.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

1) एनर्जिकाची एक्सपीरिया इलेक्ट्रिक बाइक एक रोड ओरिएंटेड ॲडव्हेंचर टूॅरिंग बाइक आहे.

2) एक्सपीरिया एनर्जिका न्यू सेकंड जनरेशन ग्रीन टूरर, टेक्नोलॉजिकल प्लॅटफॉर्मवर बेस्ड पाहिले मॉडेल आहे. हे प्लॅटफॉर्म पर्यावरणाबाबत संवेदनशिल असून कंफर्ट आहे. या शिवाय पॉवर आणि रेंजमध्ये यात चांगले बॅलेंस आहे.

हे सुद्धा वाचा

3) एनर्जिकाच्या दुसर्या ईव्ही मॉडेल्समध्ये असलेल्या स्टील चेसिसच्या ऐवजी यात नवीन ट्युबुलर ट्रॅलिस फ्रेम देण्यात आली आहे. रियर मोनोशॉकला मध्यभागी ठेवण्यात आले आहे. आणि एल्यूमिनियमची साइड प्लेट्‌स देण्यात आलेली आहेत.

4) युजर्सला यात 22.5 kWh ची लिथियम पॉलिमर बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, या बाइकमध्ये आतापर्यंतच्या सर्व बाइकच्या तुलनेत मोठा बॅटरी पॅक लावण्यात आलेला असल्याचा दावा केला जात आहे.

5) 22.5 kWh ची बॅटरी 66kW ची परर्मनेंट मॅग्नेट ॲसिस्टेड सिंक्रोनॉस रिलक्टेंस मोटरचा सपोर्ट देण्यात आला आहे.

6) सिंगल चार्जवर नवीन इलेक्ट्रिक बाइक सिटीमध्ये 420 किमीची रेंज मिळवण्यास सक्षम आहे. तर कंबाइंड रेंज 256 किमी इतकी आहे.

7) वर्ल्ड मोटरसायकल टेस्ट साइकलच्या मते, या बाइकची रियल वर्ल्ड रेंज 222 किलोमीटर सांगण्यात आली आहे.

8) इलेक्ट्रिक बाइकला 24kW डीसी चार्जरच्या लेव्हल 3 वर चार्ज केल्याने बाइकची बॅटरी 0-80 टक्केपर्यंत चार्ज होण्यासाठी केवळ 40 मिनीट लागतात.

9) युजर्सला यात अनेक खास फीचर्स मिळत आहे. एक्सपीरियामध्ये चार रिजनरेटीव्ह मोड-हाई, मीडियम, लो आणि ऑफ मिळत आहेत. तर दुसरीकडे यात चार राइडिंग मोड-इको, अर्बन, रेन आणि स्पोर्ट मोड मिळत आहेत.

10) एनर्जिका एक्सपीरियाची बुकिंग सुरु झालेली असून सध्या ही बाइक भारतील बाजारात आलेली नाही.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.