बजाजच्या CNG बाईकची तर नाही ना ही झलक, दुचाकी झाली कॅमेऱ्यात कैद

CNG Bajaj Bike | दुचाकीमध्ये बजाज क्रांती आणणार आहे. पेट्रोलनंतर इलेक्ट्रिक दुचाकींची भर पडली आहे. तर बजाज सीएनजी आणि एलपीजी बाईकचा प्रयोग करत आहे. एका दाव्यानुसार बजाजने CNG बाईक तयार केली आहे. या बाईकची रस्त्यावरील चाचणी पण सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

बजाजच्या CNG बाईकची तर नाही ना ही झलक, दुचाकी झाली कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 2:55 PM

नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : ऑटोमोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी बजाजने नवीन कार्ड खेळले आहे. सध्या बाजारात पेट्रोलला पर्याय देण्याचा प्रयत्न दुचाकी उत्पादन कंपन्या करत आहे. काही कंपन्यांनी त्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकलचा पर्याय समोर ठेवला आहे. बजाजने आणखी वेगळी वाट चोखंदळली आहे. बजाज सीएनजी आणि एलपीजी बाईक आणण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सीएनजी बाईकवर कंपनीने सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. एका दाव्यानुसार, कंपनी CNG Bike ची टेस्टिंग करत आहे. रस्त्यावरील चाचणीसाठी ही दुचाकी बाहेर पडल्याचा दावा एका छायाचित्राच्या आधारे करण्यात येत आहे.

काय असेल नवीन बाईकमध्ये

या नवीन बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क, फ्रंट डिस्क ब्रेक, एलिव्हेटेड हँडलबार, अपराइट राइडिंग पोझिशन,अलॉय व्हील हे पार्ट असतील. पल्सर NS125 चीच ही कॉपी असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या बाईकमध्ये मोनोशॉक देण्यात आले आहे. वळणदार आणि मोठी फ्युएल टाकी असल्याचे दिसून येते. सध्या या बाईकला एक सिंगल पीस सीट दिलेले दिसते. टायर हगर, इंटिग्रेटेड फूटरेस्टसह साडी गार्ड आणि इंजिन क्रॅश गार्ड यांचा समावेश आहे. एअर-कूल्ड मोटरची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच सर्व डिझाईनवरुन ही बजाजची CNG Bike असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

सीएनजी बाईकचा पर्याय का

सीएनजी बाईकची ही झलक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही CNG Bike बाजारात दाखल व्हायला एक वर्ष तरी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बाईकबाबत अजून पण भारतीय साशंक आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि ई-बाईक यामधील सीएनजी हा पर्याय भारतीयांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही बाईक बाजारात हंगामा करेल असा दावा करण्यात येत आहे.

बजाज घेणार आघाडी

कंपनी इलेक्ट्रिक बाईक, सीएनजी बाईकच नाही तर कंपनी एलपीजी, इथेनॉलवर पण बाईक आणण्याच्या तयारीत आहे. सीएनजी बाईक उत्पादनाचे लक्ष्य पण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनी जवळपास 1 ते 1.20 लाख वाहनांचे दरवर्षी उत्पादन करण्यावर भर देत आहे. भविष्यात ही क्षमता 2 लाख युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.