भारतीय बाजारात 3 नवीन कॉम्पॅक्ट SUV, तुम्ही कोणती करणार खरेदी?

Compact SUV | बाजारात लवकरच तीन नवीन कॉम्पॅक्ट SUV दाखल होत आहे. सध्या हे सेगमेंट लोकप्रिय ठरत आहे. या सेगमेंटकडे ग्राहक आकर्षित होत आहे. कमी किंमतीत चांगले फीचर असलेल्या कार बाजारात येत आहे. या कंपन्या बाजारात मांड ठोकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

भारतीय बाजारात 3 नवीन कॉम्पॅक्ट SUV, तुम्ही कोणती करणार खरेदी?
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 11:59 AM

नवी दिल्ली | 19 March 2024 : सध्या देशात एसयुव्ही सेगमेंट लोकप्रिय ठरले आहे. प्रत्येक वाहन उत्पादन कंपनी या तेजीने वाढणाऱ्या सेगमेंटमध्ये स्वतःची स्पेस निर्माण करण्याची तयारी करत आहेत. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांमध्ये या 4 मीटर एसयुव्हीची क्रेझ कायम आहे. सध्या या सेगमेंटमध्ये मारुती ब्रिझा, टाटा नेक्सॉन, हुंदाई व्हेन्यू यांचा दबदबा आहे. या कंपन्यांच्या कारची विक्री जोमात आहे. बाजारातील ही संधी हेरुन या कंपन्याच्या (New Compact SUVs Arriving) तीन नवीन एसयुव्ही दाखल होत आहेत. एका वर्षात हे मॉडेल बाजारात असतील.

  1. स्कोडा कॉम्पॅक्ट एसयुव्ही – स्कोडाने नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्हीची घोषणा केली आहे. ही कार 2025 मध्ये पहिल्या तिमाहीत दाखल होईल. नवीन सब -4 मीटर एसयुव्ही बाजारात येतील. ही MQB AO IN प्लेटफॉर्मवर आधारीत आहे. यामध्ये 1.0- लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते. 110bhp आणि 200Nm चे आऊटपूट जनरेट होईल. यामध्ये ट्रान्समिशनचा पर्याय असून 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक युनिटचा समावेश आहे.
  2. महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट – महिंद्रा येत्या आठवड्यात XUV300 या मॉडेलची कॉम्पक्ट एसयुव्हीचे अपडेटेड व्हर्झन लाँच करेल. नवीन मॉडेलची भारतीय रस्त्यावर अनेकदा चाचपणी करण्यात आली आहे. अपडेटेड XUV300 मध्ये खास डिझाईन, फीचर लोडेड इंटरिअर असेल. XUV300 फेसलिफ्टचे केबिन XUV400 EV सारखे असेल. यामध्ये दोन 10.25-इंच स्क्रीनसह एक अपडेटेड डॅशबोर्ड लेआऊट असेल. या एसयुव्हीमध्ये 360 डिग्री कॅमरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, रिअर एअर कॉन व्हेंट, पॅनोरमिक सनरुप आणि इतर फीचर्स असतील.
  3. किआ क्लॅव्हिस – किआ 2024 च्या शेवटच्या टप्प्यात एक नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्ही सादर करु शकेल. पण ही कार 2025 मध्ये बाजारात उतरविण्यात येईल. या कारला किआ क्लॅव्हिस असे नाव असेल. या खास एसयुव्हीमध्ये अनेक अडव्हान्स फीचर्स, जसे पॅनोरमिक सनरुफ, एडीएएस तंत्रज्ञान, एक मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, एक डिजिटल इन्स्ट्रूमेंट कन्सोल, 360 डिग्री कॅमेऱ्यासह इतर फीचर्सची रेलचेल असेल. ही नवीकोरी कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन्ही सह बाजारात दाखल होईल.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.