Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेकंड हँड बाईक-स्कूटर खरेदी करताय? त्याआधी ‘या’ गोष्टींकडे लक्ष्य द्या!

भारताच्या रस्त्यांवर सध्या 20 कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचं सेकेंड हँड वाहनांकडे वळणं, किंवा युज्ड टू व्हीलर्स खरेदी करणं एका अर्थी चांगलंच आहे. हे करत असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत होईल अशा यूज्ड टू-व्हीलरचा शोध घ्यायला हवा.

सेकंड हँड बाईक-स्कूटर खरेदी करताय? त्याआधी 'या' गोष्टींकडे लक्ष्य द्या!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 8:30 AM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती (Petrol Price Hike) कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या (Second hand Vehicle) दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची (Second hand bike) निवड करत आहेत. भारताच्या रस्त्यांवर सध्या 20 कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचं सेकेंड हँड वाहनांकडे वळणं, किंवा युज्ड टू व्हीलर्स खरेदी करणं एका अर्थी चांगलंच आहे. हे करत असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत होईल अशा यूज्ड टू-व्हीलरचा शोध घ्यायला हवा.

सेकेंड हँड किंवा युज्ड टू-व्हीलर शोधण्यासाठी ग्राहक खूप धडपड करत असतात आणि बहुतेक वेळा दुचाकी विकणारे आणि डीलर्स अशा दोन्हींकडूनही ग्राहकांना फसवणुकीचा सामना करावा लागतो. वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ खूप मोठी आहे, पण असे असूनही ग्राहकांना छोट्या-मोठ्या डीलर्सबरोबर हे व्यवहार करताना खूपच निराशाजनक ग्राहक अनुभव येतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी सेकंड हॅण्ड किंवा यूज्ड टू-व्हीलर्सची बाजारपेठ आणि योग्य वाहनाची निवड कशी करावी याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. याबद्दल क्रेडआर (CredR) या प्लॅटफॉर्मचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर शशीधर नंदिगम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

सेकंड हँड बाईक-स्कूटर करण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष्य द्या!

  • कंपनी प्रतिष्ठित हवी : इथे विचारात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाची सेकंड हॅण्ड दुचाकी वाजवी किंमतीत विकत घेऊ पाहणाऱ्यांनी नामांकित, विक्रीनंतरच्या सेवा, विमा आणि इतर मूल्यवर्धित सेवा, सारे एकाच ठिकाणी देऊ शकणाऱ्या कंपनी/ब्रॅण्डचीच दुचाकी खरेदी करायला हवी.
  • बजेट तयार करा : युजर्सनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना अत्यंत स्वस्त दरात मिळणारी तसेच त्यासोबत अतिरिक्त कर, अवमूल्यन (below par value) असे कोणतेही इतर घटक त्यात अंतर्भूत नसतील अशी दुचाकी विकत घेण्याचा विचार करावा. तसेच आपले बजेट ठरवताना दर्जा, बाइकचे वय, ब्रॅण्डचे मूल्य आणि आपल्याला हव्या असलेल्या टू-व्हीलरची उपलब्धता अशा इतर घटकांचाही विचार केला पाहिजे.
  • अभ्यास करा : यूज्ड टू-व्हीलर्स विकत घेऊ पाहणाऱ्यांनी ऑनलाइन तसेच सेलर्सच्या माध्यमातून या विषयाची माहिती शोधली पाहिजे व या खरेदीसाठी वास्तविक, प्रत्यक्षात उतरवता येतील अशा अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण कोणतेही टू-व्हीलर्सचे कोणतेही मॉडेल/ब्रॅण्ड त्यांच्या गरजांशी तंतोतंत जुळणारे असू शकत नाही. शिवाय इतर सेलर्सबद्दल ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, रिव्ह्यू स्कोअर्सही तपासून घ्यायला हवेत. चांगले रेटिंग आणि ऑनलाइन मंचावर ग्राहकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळविणाऱ्या यूज्ड टू-व्हीलर ब्रॅण्ड्सकडून खरेदी करणे केव्हाही चांगले.
  • घोटाळ्यांपासून सावध रहा : भारतातील वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ अजूनही खूपच असंघटित आहे, तेव्हा घोटाळेबाज, फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. इथे ग्राहकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीकडून किंवा रस्त्यावरच्या छोट्या-मोठ्या डीलर्सऐवजी प्रमाणित, एखाद्या प्रतिष्ठित विक्रेता संस्थेचे नाव असणाऱ्या सेलर्सकडूनची अशा दुचाकी विकत घेण्याची खबरदारी घ्यायला हवी.
  • होम टेस्ट राइड : खरेदीचा व्यवहार पक्का करण्याआधी ग्राहकाने गाडीची ट्रायल रन घेण्याचा विचार करायला हवा. यामुळे आपण निवडलेली दुचाकी चालविण्यासाठी किती आरामशीर आहे, तिची रस्त्यावरची कामगिरी कशी आहे, ब्रेक्स आणि इतर घटकांचे यांत्रिक कार्य कसे चालते या सर्व बारकाईने पहावयाच्या गोष्टींची कल्पना येते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात संघटित क्षेत्रातील टू-व्हीलर कंपन्या बाइक्सची होम डिलिव्हरी तसेच कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीही करत आहेत. ग्राहकांना अशा सेवांचा आवर्जून वापर केला पाहिजे.
  • कागदपत्रांची पडताळणी : सेकंड हॅण्ड बाइक विकत घेण्यापूर्वी विमा, आरसी बुक, चॅसिस नंबर, मॅन्युफॅक्चरिंगची तारीख आणि प्रदूषण प्रमाणपत्र या सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. गाडीवर आधी घेतलेले कर्ज असेल तर बँक हायपॉथीकेशन सर्टिफिकेट असायलाच हवे. आरटीओमध्ये पैसे भरून गाडीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यास तुम्ही निवडलेल्या टू-व्हीलरच्या विरुद्ध नियमभंगांचे कोणते गुन्हे वगैरे दाखल झाले आहेत किंवा नाहीत हेही कळू शकेल. सध्याच्या काळात, डुप्लिकेट कागदपत्रे मिळविणे अतिशय सोपे झाले आहे, त्यामुळे अशी कागदपत्रे देऊन सेलर्सकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अत्यंत बारकाईने पडताळणी करायला हवी.
  • वॉरंटीचा कालावधी/विक्रीनंतरचे लाभ : सेकंड हॅण्ड दुचाकीचा पर्याय निवडताना वॉरंटी संपण्याची तारीख आणि एक्स्चेंजची सुविधा किती काळापर्यंत लागू आहे हे तपासून घेणे चांगले. अशा मुद्दयांची स्पष्टपणे पडताळणी करून घेतली असेल तर खरेदी केलेल्या बाइकचा दर्जा असमाधनकारक वाटल्यास तुम्ही ती परत करू शकता किंवा तिच्या बदल्यात नवीन टू-व्हीलर घेऊ शकता.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.