मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. अशा परिस्थितीत बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की, ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या काही बाईक्सची माहिती देणार आहोत. (Top 5 Bikes which gives arount 99 KMPL Mileage)
या बाईकमध्ये तुम्हाला 109.7 सीसीचं सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड फ्युल इंजेक्ट इंजिन मिळेल, ज्याची 8.29PS इतकी पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 4-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54,850 रुपये ईतकी आहे.
या बाईकमध्ये तुम्हाला 99.27cc चं 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे 7500 rpm वर 5.81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. सोबतच या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 99 किलोमीटपर्यंतच मायलेज देते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 47,654 रुपये इतकी आहे.
100 CC इंजिन असलेली ‘कडक CT100’ तीन नव्या स्टाइलिश रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लू-एबोनी ब्लॅक, यल्लो-मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड-ग्लॉस फ्लेम रेड या तीन रंगांचा समावेश आहे. या बाईकची किंमत 46,432 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये दमदार DTSi इंजिनसह फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टँक पॅड, फ्युल मीटरसारखे आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. कडक CT100 मध्ये 100CC चं दमदार इंजिन आहे, सोबत 4 स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर मिळेल. इंजिन 7500 आरपीएम वर 7.9 बीएचपी आणि 5500 आरपीएमवर 8.34 टॉर्क निर्माण करतं. यासोबत या बाईकमध्ये टॉप 4-स्पीड गियरसह 90 KMPL चं मायलेज मिळेल. या बाईकचं फ्रन्ट सस्पेंशन हायड्रोलिक टेलेस्कोपिक आणि स्प्रिंग-इन-स्प्रिंग 100mm व्हील ट्रॅवलचं रियर सस्पेन्शन आहे.
या बाईकमध्ये तुम्हाला 109.51 cc चं एयर कूल्ड, 4 स्ट्रोक SI, BS-VI इंजिन दिलं आहे. या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 74 किलोमीटरचं मायलेज देते. Honda Livo ची एक्स शोरूम किंमत 70,059 रुपये इतकी आहे.
या बाईकची एक्स शोरुम किंमत 67,100 रुपये आहे. BS-VI इंजिन असलेली ही बाईक 75 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.
संबंधित बातम्या
Aprilia SXR 125 स्कूटर लाँच, केवळ 5,000 रुपयात बुकिंग करा
Bajaj Auto चा जलवा कायम, एका महिन्यात 3,69,448 वाहनांची विक्री
अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220
(Top 5 Bikes which gives arount 99 KMPL Mileage)