World Most Expensive Cars : जगातील सर्वात महागड्या कार कोणत्या? जाणून घ्या किंमत

जगातील सर्वात महागड्या कारची माहिती तुम्हाला देणार आहोत. या कारच्या किमती कोट्यवधी रुपयांपर्यंत आहेत आणि त्यांची डिझाईन, स्पीड आणि वैशिष्ट्ये अद्वितीय आहेत.

World Most Expensive Cars : जगातील सर्वात महागड्या कार कोणत्या? जाणून घ्या किंमत
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:28 PM

World Most Expensive Cars : जगभरात कारच्या शौकिनांची संख्या वाढताना दिसत आहे. मार्केटमध्ये आलेल्या नवनव्या कार घेण्यावर या वर्गाचा भर असतो. प्रत्येक नव्या कारमध्ये अनेक व्हरायटीज असतात. त्यामुळे या कार खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. शिवाय जगात अनेक मजबूत आणि दमदार कार उपलब्ध आहेत. तुम्हाला जगातील या सर्वात महागड्या कार माहीत आहेत का? तुम्हाला आम्ही जगातील सर्वात महागड्या आणि उंची कारची माहिती देणार आहोत. या कारची जगभरातील बड्या लोकांना मोठी क्रेझ असते.

Rolls Royce Boat Tail

ही जगातील सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत 205 कोटी रुपये आहे. ही महागडी कार असली तरी त्याची अत्यंत लिमिटेड मॉडल्स आहेत. ही चार सीटरवाली कार दिसायलाही अत्यंत रॉयल आहे. या कारचा लूक कुणाला आवडणार नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. ही कार 5 सेकंदात 100 kmphचा स्पीड देते. या कारमध्ये असंख्य भारी फिचर्स आहेत. त्यामुळेच ही कार अत्यंत महागडी आहेत. विशेष म्हणजे एवढी महागडी कार असूनही ती खरेदी करण्यासाठी अनेकांचा आटापिटा असतो.

Bugatti La Voiture Noire

ही सुद्धा जगातील दुसऱ्या क्रमांकाची महागडी कार आहे. ही कार 2019मध्ये लॉन्च झाली होती. या कारची किंमत 132 कोटी रुपये आहे. या कारला द ब्लॅक कलर कारच्या नावानेही ओळखली जाते. या कारची टॉप स्पीड 420 kmph एवढी आहे.

Pagani Zonda HP Barchetta

ही जगातील तिसरी महागडी आणि चर्चेत असलेली कार आहे. या कारची किंमत 125 कोटी रुपये आहे. या कारचा लूक अत्यंत भारी आहे. या कारची टॉप स्पीड 335 kmph आहे. ही कार केवळ 2.8 सेकंदात 100 km ची स्पीड पकडते.

Rolls Royce Sweptail

जगातील सर्वात महागडी कार म्हणून Rolls Royce Sweptail कडे पाहिलं जातं. ही कार इतकी लग्जरी आहे की तुम्ही तिच्याकडे पाहतच राहाल. अनेक सिनेमात या कारचा वापर केला जातो. ही कार बनवण्यासाठी कंपनीला पाच वर्ष लागली होती. या कारची टॉप स्पीड 250 kmph आहे.

Bugatti Centodieci

Bugatti Centodieci ही कार काही कमी नाहीये. या लग्जरी कारची किंमत 64 कोटी रुपये आहे. या कारचा स्पीड ताशी 420 किलोमीटर इतका आहे.

2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.