1 लीटर पेट्रोलमध्ये 99 किलोमीटर धावणार, Bajaj, Hero च्या ‘या’ बजेट बाईक्स
आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या टॉप 9 बाईक्सची माहिती देणार आहोत. (Top 9 Bikes which can giv arount 99 KMP Mileage)
मुंबई : बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या काही बाईक्सची माहिती देणार आहोत. (Top 9 Bikes which can giv arount 99 KMPL Mileage)
TVS Sport
या बाईकमध्ये तुम्हाला 109.7 सीसीचं सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड फ्युल इंजेक्ट इंजिन मिळेल, ज्याची 8.29PS इतकी पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 4-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54,850 रुपये ईतकी आहे.
Bajaj CT100
या बाईकमध्ये तुम्हाला 99.27cc चं 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे 7500 rpm वर 5.81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. सोबतच या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 99 किलोमीटपर्यंतच मायलेज देते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 47,654 रुपये इतकी आहे.
Bajaj कडक CT100
100 CC इंजिन असलेली ‘कडक CT100’ तीन नव्या स्टाइलिश रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लू-एबोनी ब्लॅक, यल्लो-मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड-ग्लॉस फ्लेम रेड या तीन रंगांचा समावेश आहे. या बाईकची किंमत 46,432 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये दमदार DTSi इंजिनसह फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टँक पॅड, फ्युल मीटरसारखे आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. कडक CT100 मध्ये 100CC चं दमदार इंजिन आहे, सोबत 4 स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर मिळेल. इंजिन 7500 आरपीएम वर 7.9 बीएचपी आणि 5500 आरपीएमवर 8.34 टॉर्क निर्माण करतं. यासोबत या बाईकमध्ये टॉप 4-स्पीड गियरसह 90 KMPL चं मायलेज मिळेल. या बाईकचं फ्रन्ट सस्पेंशन हायड्रोलिक टेलेस्कोपिक आणि स्प्रिंग-इन-स्प्रिंग 100mm व्हील ट्रॅवलचं रियर सस्पेन्शन आहे.
Honda Livo
या बाईकमध्ये तुम्हाला 109.51 cc चं एयर कूल्ड, 4 स्ट्रोक SI, BS-VI इंजिन दिलं आहे. या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 74 किलोमीटरचं मायलेज देते. Honda Livo ची एक्स शोरूम किंमत 70,059 रुपये इतकी आहे.
Hero Splendor iSmart 110
या बाईकची एक्स शोरुम किंमत 67,100 रुपये आहे. BS-VI इंजिन असलेली ही बाईक 75 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.
Hero Splendor Plus
कंपनीने ही बाईक नवीन स्टाईलमध्ये सादर केली आहे. यामध्ये तुम्हाला BS6 100cc चं सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. जे 8000 Rpm वर 7.91 Bhp पॉवर आणि 6000 Rpm वर 8.05 Nm टॉर्क जेनरेट करु शकतं. सोबतच या बाईकमध्ये 4-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 87 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. या बाईकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 59,750 रुपये इतकी आहे.
बजाज प्लॅटिना (Bajaj Platina)
या बाईकमध्ये कंपनीने 102cc चं BS6 कम्पलाइंट इंजिन दिलं आहे जे 8bph पॉवर आणि 8nm टॉर्क जनरेट करतं. हे 4-स्पीड ट्रांसमिशनने लेस असलेलं इंजिन एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देतं. या बाईकची किंमत 51,667 रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे.
हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus)
या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 61,785 रुपये आहे. यामध्ये एकूण 3 मॉडेल आहेत. बाईकमध्ये 97.2cc इंजिन देण्यात आलं आहे, जे 81 किमीचे मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे.
बजाज प्लॅटिना 100ES (Bajaj Platina 100ES)
या बाईकची किंमत 64,301 रुपये आहे. बाईकमध्ये 102cc इंजिन आहे. कंपनीने दावा केला आहे की ही बाईक 97 किमीचे मायलेज देते. डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेकच्या वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये ही बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 110cc H-GEAR मॉडेलसहदेखील उपलब्ध आहे.
पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक#electricity #ElectricVehicle #ElectricBike #ElectricCars https://t.co/lGH5t2l0YU
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2021
संबंधित बातम्या
7 रुपयात 100 KM प्रवास करा, ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची गरज नाही
सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर
(Top 9 Bikes which can giv arount 99 KMPL Mileage)