Cruisers Bikes : काश्मीरपासून गाठा कन्याकुमारी, अजिबात येणार नाही थकवा, बजेटमधील या दमदार मोटारसायकलची बातच न्यारी!

Cruisers Bikes : लांब सफरीसाठी या बाईकवरची रफेट म्हणजे मजाच की राजे हो..

Cruisers Bikes : काश्मीरपासून गाठा कन्याकुमारी, अजिबात येणार नाही थकवा, बजेटमधील या दमदार मोटारसायकलची बातच न्यारी!
लांब रस्त्याचा साथीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 7:43 PM

नवी दिल्ली : बाईक प्रेमींसाठी खास सफर, तुम्ही बाईकवर लांबच लांब पल्ला गाठत असाल तर थकल्यासारखं नक्कीच होतं. पण बाईक उत्पादक कंपन्यांनी यावर नामी शक्कल लढवली आहे. त्यामुळे तुमचा दूरचा प्रवास (Long Distance) अगदी आरामदायक होईल. अर्थात मोठा पल्ला गाठला तरी तुम्हाला एकदम थकल्यासारखं (Tired) वाटणार नाही. क्रूझर्स बाईक्स (Cruisers Bikes) खास रायडर्ससाठी तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या मोटारसायकल (Motorcycle) 2 लाख रुपयांच्या आतील बजेटमध्ये (Budget) मिळतील. त्यामुळे दूरवरचे प्रदेश तुम्ही पालथे घालू शकता आणि प्रवासाचा आनंद लूटू शकता. मग वाट कसली बघता, एकदा रपेट मारुनच पहा..

Bajaj Avenger 160 Street ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास क्रुझर बाईक आहे. यामध्ये राईडिंग पोझिशन अत्यंत आरामदायक आहे. यामध्ये 160सीसीचं इंजिन देण्यात आले आहे. राईडर अत्यंत आरामात बसून बाईक चालवू शकतो. बाईक जोरदार दामटू शकतो.

हे इंजिन 14bhp आणि 13.7 Nm आउटपुट देते. या बाईकमध्ये समोर 17 ​​इंचाचे अलॉय व्हील मागील बाजूस लहान 15-इंचाच्या अलॉय व्हील असते. ही बाईक 1.12 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. शहरानुसार किंमतीत फरक असण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

Bajaj Avenger Cruise 220, एव्हेंजर स्ट्रीट 160 नंतरची मोठी बाईक आहे. या बाईकचे इंजिन मोठे आणि अपडेटेड स्टाईलिंगसह येते. यामध्ये 220सीसी, सिंगल-सिलेंडर, ऑईल-कूल्ड इंजिन आहे. त्यामुळे दूरच्या रपेटीचा खरा आनंद मिळतो.

हे इंजिन 18.7बीएचपी पीक पॉवर आणि 17.5 एनएम पीक टॉर्क आउटपूट देते. या बाईकची किंमत 1.38 लाख रुपयांपर्यंत आहे. शहरानुसार किंमतीत फरक असू शकतो. पण बाईक प्रेमींसाठी या दुचाकीवरची रपेट भन्नाट अनुभव देणारा आहे.

Royal Enfield Hunter 350, अर्थात नाम ही काफी है. खरंय की नाही मित्रांनो. रॉयल एनफिल्डकडून ही सर्वास्त स्वस्त आणि दमदार बाईक असल्याचा दावा करण्यात येतो. ही बाईक 1.50 लाख रुपयांपर्यंत मिळते. तुमच्या शहरातील किंमतीत फरकही असू शकतो.

रॉयल एनफिल्डची ही सर्वात जास्त विक्री होत असलेली आणि तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत असलेली बाईक आहे. रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे.

Yezdi Roadster ही बाईक प्रेमींची वीक पॉईंट आहे. येज्दी रोडस्टरमध्ये 334सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फ्यूअल-इंजेक्टेड DOHC इंजिन येते. त्याआधारे बाईक वेगचा पल्ला गाठण्यासाठी 7,300 RPM वर 28bhp पॉवर आणि 6,500 RPM वर 29 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 2 लाखांच्या घरात आहे. शहारानुसार किंमतीत फरक असू शकतो.

Komaki Ranger या कंपनीने नव्या जमान्याचा मंत्र जपला आहे. कोमाकी रेंजर ही एक इलेक्ट्रिक क्रूजर बाईक आहे. या बाईकमध्ये 4kWh बॅटरीचा वापर होतो. या बाईकची इलेक्ट्रिक मोटर 5.3bhp पॉवर जनरेट करते. त्यामुळे तुम्हाला बाईक राईडचा आनंद मिळतो.

फुल चार्ज असताना ही बाईक 180-200 प्रति किलोमीटरचा वेग देते. या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. या बाईकची किंमत 1.74 लाखांच्या घरात आहे. शहरानुसार किंमतीत फरक येऊ शकतो. पर्यावरणाला हानी न पोहचवता, तुम्ही इच्छित स्थळी पोहचू शकता.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.