Toyota bZ4X: 559 KM रेंजसह टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच, Hyundai Ioniq 5, Kia EV6 ला टक्कर

टोयोटाने (Toyota) यूएस आणि जपानच्या बाजारपेठेसाठी आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV टोयोटा बीझेड4एक्स (Toyota bZ4X) लॉन्च केली आहे. 2022 bZ4X इलेक्ट्रिक SUV (Toyota bZ4X Electric SUV), जी Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 ला बाजारात टक्कर देईल.

Toyota bZ4X: 559 KM रेंजसह टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच, Hyundai Ioniq 5,  Kia EV6 ला टक्कर
Toyota bZ4X Electric SUVImage Credit source: Toyota
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:32 PM

मुंबई : टोयोटाने (Toyota) यूएस आणि जपानच्या बाजारपेठेसाठी आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV टोयोटा बीझेड4एक्स (Toyota bZ4X) लॉन्च केली आहे. 2022 bZ4X इलेक्ट्रिक SUV (Toyota bZ4X Electric SUV), जी Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 ला बाजारात टक्कर देईल. नवीन एसयूव्ही कार निर्मात्या कंपनीच्या जपानमधील प्लांटमध्ये तयार केली जाईल. इलेक्ट्रिक एसयूव्ही जपानी कार निर्मात्या कंपनीच्या ई-टीएनजीए प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Toyota लाँचच्या पहिल्या वर्षात 5,000 bZ4X SUV ची विक्री करेल अशी अपेक्षा आहे. bZ4X SUV लोकप्रिय RAV4 SUV पेक्षा थोडी उंच दिसते. यात 15 सेमी लांब व्हीलबेस आणि 5 मिमी अधिक रुंदी आहे. टोयोटाचा दावा आहे की bZ4X इलेक्ट्रिक SUV मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये सर्वात मोठी लेग रूम ऑफर करते.

bZ4X इलेक्ट्रिक SUV तिच्या न्यू जनरेशन डिझाईन लँग्वेजसह फ्यूचरिस्टिक कार आहे. टोयोटा फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) या दोन्ही सिस्टमसह इलेक्ट्रिक SUV ऑफर करेल.

bZ4X इलेक्ट्रिक एसयूव्हीचं इंटीरियर

bZ4X चे आतील भाग देखील प्रीमियम फील दर्शवतो. रस्त्यावरचा आवाज कमी करण्यासाठी टोयोटाने केबिनमधील विंडशील्डची जाडी वाढवली आहे. सेंटर कन्सोलला स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंग, USB C आणि A पोर्ट व्यतिरिक्त 12.3 इंचाची मल्टीमीडिया सिस्टिमदेखील मिळते. यातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यात तुम्हाला पाच डिव्हाईसेस कनेक्ट करत येतील. यात बिल्ट-इन 4G मॉडेम देखील आहे. टोयोटाने यात आठ-चॅनल 800W अॅम्प्लिफायर आणि नऊ-इंच सबवूफरसह नऊ-स्पीकर JBL स्पीकर सिस्टम देखील दिली आहे.

bZ4X इलेक्ट्रिक एसयूवीचे फीचर्स

टोयोटा इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या मालकांना डिजिटल कीचा अॅक्सेस मिळेल, ही की स्मार्टफोनवर मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेअर करता येईल. जेणेकरून ते मालकाच्या अनुपस्थितीत कार वापरू शकतील. bZ4X इलेक्ट्रिक SUV FWD व्हेरिएंट 201 hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे, तर AWD व्हर्जन 214 hp पर्यंत आऊटपुट देईल. इलेक्ट्रिक SUV FWD व्हेरियंटसह सात सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग धारण करु शकते तर AWD व्हेरिएंट जवळपास 6.5 सेकंदात 100 किंमी वेग प्राप्त करेल.

bZ4X इलेक्ट्रिक एसयूव्हीचे स्पेसिफिकेशन्स

FWD मॉडेल सिंगल चार्जमध्ये 559 किलोमीटपर्यंतची रेंज देईल. तर AWD मॉडेलची श्रेणी सिंगल चार्जवर 540 किमीपर्यंत आहे. टोयोटा विविध चार्जिंग पर्यायांसह bZ4X ऑफर करते. यामध्ये 120V आणि 240V चार्जर तसेच DC फास्ट-चार्जरचा समावेश आहे. bZ4X मॉडेल सर्व सॉकेटने सुसज्ज आहेत जे घर आणि सार्वजनिक चार्जिंगला सपोर्ट करतात. 6.6 kW च्या चार्जरने bZ4X ला लेव्हल 2 चार्जरने घरी किंवा सार्वजनिक चार्जरने 9 तासांत पूर्ण चार्ज करता येतो.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.