Toyota : टोयोटाच्या ‘या’ गाडीचा सेल तब्बल 320 टक्क्यांनी वाढला… काय आहे कारण?
टोयोटाने एप्रिलमध्ये एकूण 15,085 वाहनांची विक्री केली आहे. एप्रिलमध्ये फॉर्च्युनर आणि अर्बन क्रूझरची विक्रीही चांगली राहिली आहे.
मुंबई : एप्रिलमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) कंपनीच्या विक्रीत 57 टक्के वाढ झाली आहे. कंपनीची इनोव्हा (innova)क्रिस्टा, फॉर्च्युनर आणि अर्बन क्रूझर या लोकप्रिय वाहनांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दमदार इंजीन, आकर्षक लूक, मायलेज, सेफ्टी फीचर्स आदी विविध कारणांमुळे या कार लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत असतात. टोयोटा (Toyota) इनोव्हा क्रिस्टाला भारतीय कार बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ग्राहकांच्या नेहमीच पसंतीला उतरलेली आहे. एप्रिलमध्ये त्याची विक्रीही प्रचंड वाढली आहे. टोयोटाने एप्रिलमध्ये एकूण 15,085 वाहनांची विक्री केली आहे. एप्रिलमध्ये फॉर्च्युनर आणि अर्बन क्रूझरची विक्रीही चांगली राहिली आहे. या सर्व गाड्यांमध्ये सर्वाधिक पसंतीची कार बनली आहे ती म्हणजे इनोव्हा.
इनोव्हा क्रिस्टाची विक्री वाढली
एप्रिल 2022 मध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टा हे कंपनीचे सर्वात लोकप्रिय वाहन ठरले आहे. कंपनीचे हे सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. एप्रिलमध्ये कंपनीने 6,351 इनोव्हा क्रिस्टा विकल्या, जे गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये झालेल्या 3,600 वाहनांच्या विक्रीपेक्षा 76.42 टक्के जास्त आहेत. इनोव्हा क्रिस्टलच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 17.45 लाख रुपयांपासून सुरू होते, तर डिझेल व्हर्जनची किंमत 18.63 लाख रुपयांपासून सुरू होते.
वेलफायरच्या विक्रीत 320 टक्के वाढ
टोयोटाच्या लक्झरी Hybrid Elelcric कार Vellfire च्या विक्रीत एप्रिलमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये 105 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केवळ 25 युनिटची विक्री झाली होती. त्याची किंमत 90.80 लाख रुपयांपासून सुरू होते.
फॉर्च्युनर, अर्बन क्रूझरही जोमात
टोयोटा फॉर्च्युनर आणि अर्बन क्रूझरची विक्रीही एप्रिलमध्ये चांगली झाली आहे. अनुक्रमे 2,022 आणि 3,524 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 43 टक्के आणि 66.62 टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली आहे. दरम्यान, टोयोटाने एप्रिलमध्ये एकूण 15,085 वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये Glanza च्या 2,646 युनिट्सचा देखील समावेश आहे. Hilux ट्रक 308 युनिट्स, Camry 129 युनिट्सचा समावेश आहे. Toyota Yaris ने एप्रिलमध्ये एकही युनिट विकले नाही.