मुंबई : ट्रायम्फ मोटारसायकल कंपनीची (Triumph Motorcycle) शानदार 2021 टायगर 850 स्पोर्ट (Triumph Tiger 850 Sport) ही बाईक सध्या खूपच चर्चेत आहे. भारतीय बाजारात या मोटारसायकलची किंमत 11,95,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नवी टायगर ट्रायम्फची ही अॅडवेंचर बाईक टायगर रेंजमध्ये एंट्री-लेव्हल मॉडलच्या रुपात सादर करण्यात आली आहे. ही बाईक सध्याच्या बेस टायगर 900 एक्सआर ट्रिम (Triumph Tiger 900 XR Trim) या बाईकचं रिप्लेसमेंट आहे. (Triumph Tiger 850 Sport Motorcycle Price Features and details)
नव्या Tiger 850 Sport या बाईकमध्ये ऑल-एलईडी लायटिंग, दोन रायडिंग मोड्स, रेन अँड रोड, 5-इंचांची फुल-कलर टीएफटी स्क्रीन आणि स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोलसारखे फीचर्स आहेत. ही बाईक दोन वर्षांच्या असिमित मायलेज वॉरंटीसह सादर करण्यात आली आहे. या बाईकचा सर्व्हिस इंटर्व्हल 16 हजार किमींचा आहे. ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट ही बाईक 2020 मध्ये जागतिक बाजारात लाँच करण्यात आली होती. आता ही बाईक भारतातही लाँच करण्यात आली आहे. टायगर 900 प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन टायगर 850 स्पोर्ट मध्ये LED लायटिंग सिस्टिम मिळते, जी 12V सॉकेटसह येते. यामुळे तुमचा फोन चार्ज करता येतो. ही ट्रायम्फ ब्रँडची सर्वात स्वस्त बाईक आहे. ही बाईक टुरिस्ट्सह रायडर्सनाही आवडेल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
1. ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट बाईकमध्ये रायडिंगसाठी दोन मोड्स देण्यात आले आहेत. रोड आणि रेन असे हे दोन मोड्स या बाईकमध्ये आहेत. हे दोन्ही मोड्स थ्रॉटल आणि ट्रॅक्शन कंट्रोल मॅप्ससह येतात.
2. 2021 ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट पॉवर टी-प्लेन क्रँकशाफ्टने सुसज्ज 888 सीसी इन-लाइन तीन-सिलेंडर इंजिनासह सादर करण्यात आली आहे.
3. या बाईकचं इंजिन 8500 आरपीएमवर 84 बीएचपी पॉवर आणि 6500 आरपीएमवर 82 एनएम पीक टॉर्क जनरेट करु शकतं. ही बाईक टायगर 900 हून केवळ 10 बीएचपी आणि 5 एनएम ने कमी आहे.
4. लांबच्या प्रवासासाठी या बाईकमध्ये कंपनीने 20 लीटरचा फ्युल टँक दिला आहे जो अॅडजस्टेबल विंडस्क्रीनसह येतो.
5. टायगर 850 स्पोर्टमध्ये हाय कॉन्ट्रास्ट 5 इंचांचा फ्यूल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे जो तुम्हाला परफेक्ट लाईट कंडिशन प्रदान करतो.
6. नवीन ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट ही बाईक कंपनीने दोन रंगांच्या पर्यायांसह सादर केली आहे. यामध्ये ग्रेफाइट डायब्लो रेड आणि ग्रेफाइट कॅस्पियन ब्लू या रंगांचा समावेश आहे. या बाईकमध्ये तुम्ही ट्रायम्फच्या 60 एक्सेसरीज लावू शकता.
7. नवीन टायगर 850 स्पोर्टच्या टी-प्लेन मोटरला कम आरपीएमवर अधिक ट्रॅक्टबिलिटीसाठी ऑप्टिमाईज केलं गेलं आहे.
8. बाईकमध्ये ब्रेकिंगसाठी ब्रेमबो स्टाईल कॅलीपर्स देण्यात आले आहेत, तसेच या बाईकमध्ये 19 इंचांचे फ्रंट आणि 17 इंचांचे रियर व्हील्स देण्यात आले आहेत.
हेही वाचा
Honda ची आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स
केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…
(Triumph Tiger 850 Sport Motorcycle Price Features and details)