ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत

| Updated on: Feb 09, 2021 | 2:36 PM

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत(Triumph Tiger 850 Sport launch in india)

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत
ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक
Follow us on

नवी दिल्ली : ट्रायम्फ मोटारसायकलची नवी बाईक ‘ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स’ आज भारतात लाँच करण्यात आली. या नव्या अॅडव्हेंचर बाईकची किंमत 11,95,000 रुपये एवढी आहे. टायगर ट्रायम्फची नवी बाईक टायगर रेंजमध्ये एन्ट्री लेवल मॉडेल आहे. ही बाईक टायगर 900 एक्सआर ट्रीमला रिप्लेसमेंट आहे. आधुनिक फिचर असलेल्या या बाईकला दोन वर्षाची अनलिमिटेड मायलेज वॉरंटी आहे. (Triumph Tiger 850 Sports launch in india)

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्सची वैशिष्ट्य?

टायगर 900 प्लेटफॉर्म वर आधारीत ही नवी टायगर 850 स्पोर्ट्स बाईकमध्ये एलईडी लायटिंग सिस्टम आहे, जी 12V सॉकेट सह मिळते. यामुळे तुमचा स्मार्टफोनही चार्ज होतो. ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्समध्ये दोन नविन रायडींग मोड्स देण्यात आले आहेत. हे मोड्स थ्रॉटल आणि ट्रॅक्शन कंट्रोल मॅप्ससह येतात. बाईकच्या मोटरला 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे. या बाईकमध्ये 888cc इन लाईन तीन सिलेंडर इंजिन देण्यात आलेत, जे 6 स्पीड ट्रान्स्मिशनसह येतात. बाईकमध्ये हाय कॉन्ट्रास्ट 5 इंचाचे फ्यूल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले आहे, जे तुम्हाला चांगली लाईट कंडिशन देतात. ही बाईक सर्वाधिक किफायतशीर आणि दमदार बाईक आहे.

नव्या रायडर्सना ही बाईक भुरळ नक्कीच पाडेल. या बाईकमध्ये पावर टी-प्लेन क्रँकशाफ्ट से लॅस 888 सीसी इन-लाईन तीन सिलेंडर इंजिन येतात. याचे इंजन 8500 आरपीएम पर 84 बीएचपी पॉवर आणि 6500 आरपीएम वर 82 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. लाँग ड्राईव्ह राईड्ससाठी ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट मध्ये 20 लिटर का फ्यूल टँक आहे. ट्रायम्फ मोटरसायकल्सचे म्हणणे आहे की नविन टायगर 850 स्पोर्ट च्या टी-प्लेन मोटरला कमी आरपीएमवर अधिक ट्रॅक्टबिलिटीसाठी ऑप्टिमाईज केले आहे. बाईकमध्ये ब्रेमबो स्टाइलमा कॅलीपर्सही देण्यात आलेत. (Triumph Tiger 850 Sports launch in india)

 

 

संबंधित बातम्या

Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाख रुपयांचा बंपर डिस्काऊंट, Santro, Aura आणि इलेक्ट्रिक कारचाही समावेश

जबरदस्त फीचर्स आणि 1.6 लाख किमी वॉरंटीसह Electric Jaguar I-Pace भारतात लाँच होण्यास सज्ज

बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार