मारूतीच्या या कारमध्ये गडबड, 17 हजार कार बाजारातून परत घेण्याचा निर्णय

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकी कंपनीने आपल्या सतरा हजाराहून अधिक कारना बाजारातून परत मागे बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. या कारमध्ये काही तांत्रिक दोष असल्याने चालकांनी त्या चालवू नयेत असे म्हटले आहे.

मारूतीच्या या कारमध्ये गडबड, 17 हजार कार बाजारातून परत घेण्याचा निर्णय
Brezza_1Image Credit source: Brezza_1
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 12:15 PM

मुंबई : जर तुम्ही अलिकडेच मारूती कंपनीची गाडी खरेदी केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मारूती कंपनीने सतरा हजार कारमध्ये गडबड आढळल्याने त्यांना बाजारातून परत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कंपनीच्या अनेक महत्वाच्या प्रसिद्ध मॉडेलचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये अल्टो, ब्रेजापासून अलिकडेच लाँच झालेल्या ग्रँड विटाराचाही समावेश आहे. या कारना न चालविता तातडीने त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या कारच्या मालकांना कंपनीच्या अधिकृत शोरूममधून संदेश पाठविण्यात आला आहे.

मारूती कंपनीने आपल्या ग्राहकांना सावधान करीत आपल्या काही अलिकडेच बाजारात विकलेल्या गाड्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या चालकांनी या कार चालविणे धोक्याचे असल्याने त्यांनी त्या चालवू नयेत अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत. संशयित वाहनांमधील काही महत्वाचे भाग जोपर्यंत बदलले जात नाहीत तोपर्यंत ही वाहने चालवू नयेत असे कंपनीने म्हटले आहे. वाहनांच्या मालकांना मारूती सुझुकी कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपमधून संदेश जाऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्या गाड्यांना परत बोलावले आहे.

मारूती सुझुकी कंपनीने बुधवारी एक पत्रक जारी केले आहे. त्यात काही गाड्यांच्या खराब एअरबॅग नियंत्रकांना बदल्यास सांगितले आहे. त्यात अल्टो के 10, ब्रेजा, बलेनो या मॉडेलच्या 17,362 गाड्यांना त्यासाठी परत बोलविले आहे. देशाच्या सर्वात मोठ्या कार निर्मात्याने म्हटले आहे की 8 डिसेंबर 2022 आणि 12 जानेवारी 2023 दरम्यान निर्माण झालेल्या अल्टो के 10, एस-प्रेसो, ईको, ब्रेझा, बलेनो, आणि ग्रँड विटारा या कारना परत बोलविण्यात आलो आहे.

काय झाला आहे बिघाड

या कारमध्ये आवश्यकता वाटल्यास एअरबॅग नियंत्रकाची मोफत तपासणी केली जाईल. यात काही तरी दोष असल्याचा संशय आहे. त्यामुळे अपघाताप्रसंगी एअरबॅग आणि सिटबेल्टच्या कार्यावर परीणाम होऊ शकतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.