TVS ची लोकप्रियता कायम, एका महिन्यात 3,22,683 वाहनांची विक्री

अलीकडेच ऑटो कंपन्यांनी मार्च महिन्यातील विक्रीचे आकडे शेअर केले आहेत, त्यावरुन स्पष्ट होतंय की, हा महिना ऑटो कंपन्यांसाठी चांगला होता.

TVS ची लोकप्रियता कायम, एका महिन्यात 3,22,683 वाहनांची विक्री
TVS sport
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 7:10 AM

मुंबई : अलीकडेच ऑटो कंपन्यांनी मार्च महिन्यातील विक्रीचे आकडे शेअर केले आहेत, त्यावरुन स्पष्ट होतंय की, मार्च महिना ऑटो कंपन्यांसाठी खूप चांगला होता. टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) मार्चमध्ये एकूण 3,22,683 वाहनांची विक्री केली आहे. मार्च 2020 मध्ये कोविड -19 मुळे लॉकडाऊन लादण्यात आला, तेव्हा कंपनीने 1,44,739 वाहनांची विक्री केली होती. (TVS Motor Company sells 3.22 units two-wheeler in March 2021)

टीव्हीएस मोटरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 3,07,437 युनिट्स इतक्या दुचाकींची विक्री केली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,33,988 युनिट्स दुचाकींची विक्री केली होते. गेल्या महिन्यात देशांतर्गत दुचाकींची विक्री 2,02,155 युनिट्स इतकी होती. मार्च 2020 मध्ये ही आकडेवारी 94,103 वाहनं इतकी होती.

मार्च 2020 मध्ये कंपनीने 66,673 युनिट्स स्कूटर्सची विक्री केली होती. तर गेल्या महिन्यात (मार्च 2021 मध्ये कंपनीने 1,04,513 युनिट्स स्कूटरची विक्री केली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 1,19,422 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे. तर मार्च 2020 मध्ये कंपनीने केवळ 50,197 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. कंपनीने गेल्या महिन्यात केलेल्या एकूण निर्यातीपैकी 1,05,282 युनिट्स दुचाकी वाहनं आहेत. मार्च 2020 मध्ये हीच आकडेवारी 39,885 युनिट्स इतकी होती.

मार्च 2021 मध्ये रेकॉर्डब्रेक निर्यात

टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) जाहीर केले आहे की, मार्च 2021 मध्ये कंपनीच्या दुचाकींची निर्यात 100,000 युनिट्सपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये मोटारसायकल विक्रीत झालेल्या वाढीचे या कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीच्या दुचाकींची निर्यात 35 टक्क्यांनी वाढून 89,436 युनिट्सवर पोहोचली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या तिमाहीत टीव्हीएस मोटर कंपनीची एकूण निर्यात 2.61 लाख इतकी होती, तर एप्रिल ते डिसेंबर 2020 पर्यंत ही निर्यात 5.55 लाख युनिट्स इतकी होती.

निर्यातीच्या बाबतीत हा मैलाचा दगड पार केल्यानंतर टीव्हीएस मोटर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले की, “आमच्या आंतरराष्ट्रीय दुचाकी व्यवसायाने मार्च महिन्यात 100,000 युनिट्सची विक्री साधली असल्याने टीव्हीएस मोटर कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्टी आहे. आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहक, वितरक, पुरवठा करणारे आणि आमच्या दमदार टीमचे आभारी आहोत, ज्यांच्यामुळे हे सर्वकाही शक्य झालं आहे.

Bajaj Auto चा जलवा कायम

टीव्हीएसव्यतिरिक्त वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) मार्च महिन्यात एकूण 3,69,448 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड-19 च्या विघ्नादरम्यानही कंपनीने (मार्च 2020) 2,42,575 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने देशांतर्गत बाजारात गेल्या महिन्यात 1,98,551 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात देशांतर्गत बाजारात 1,16,541 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. मार्च 2020 मध्ये कंपनीने 2,10,976 दुचाकी वाहनांची विक्री केली होती. तर एकूण 39,315 युनिट्स व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.

बजाज ऑटोने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात त्यांनी एकूण 1,70,897 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीने 1,26,034 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीने 39,72,914 वाहनांची विक्री केली होती. तर 2019-20 मध्ये कंपनीने 46,15,212 वाहनांची विक्री केली होती. यामध्ये तब्बल 14 टक्क्यांची घट झाली होती. दरम्यान, कंपनीने देशांतर्गत बाजारात 2019-20 च्या 24,44,107 युनिट्स वाहनांच्या विक्रीत 21 टक्क्यांची घट होऊन 19,18,667 वाहनांची विक्री कंपनीने केली आहे.

इतर बातम्या

‘या’ 5 गाड्यांचा भारतीय बाजारात बोलबाला, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220

(TVS Motor Company sells 3.22 units two-wheeler in March 2021)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.