Upcoming Car Launches in April 2022: मारुती, टाटा, मर्सिडीजच्या गाड्या एप्रिलमध्ये लाँच होणार, पाहा संपूर्ण यादी
Upcoming Cars in April Nexon Ertiga Mercedes EV: टाटा ते मारुती आणि EV ते MPV पर्यंत, नवीन कार एप्रिल महिन्यात लॉन्च केल्या जाऊ शकतात. त्यात मर्सिडीज कारचाही समावेश आहे.
Upcoming Car Launches in April 2022: मार्च महिना संपला आहे आणि आजपासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या एप्रिल महिन्यात अनेक नवीन कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये मर्सिडीज ईक्यूएस (Mercedes EQS), न्यू टाटा नेक्सॉन ईव्ही (New Tata Nexon EV), मारुती अर्टिगा फेसलिफ्ट (Maruti Ertiga facelift) सारख्या कारचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर एकदा या नवीन लाँच होणाऱ्या कारबद्दल जाणून घ्या. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कारचाही समावेश आहे. मारुती सुझुकी कंपनी या महिन्यात दोन गाड्या लाँच करणार आहे. त्यामध्ये New Maruti XL 6 चा देखील समावेश आहे. मारुती XL 6 नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
- New Maruti Ertiga : मारुती अर्टिगा एप्रिल महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. ही एमपीव्ही कार अनेक चांगल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येईल. CNG व्हेरिएंटमुळे Ertiga चांगली लोकप्रियता मिळवत आहे. मात्र, आगामी व्हेरियंटबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही. सध्याच्या व्हेरियंटमध्ये 1.5 लीटर इंजिन आहे, ज्यासोबत 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बंपर आणि इंटीरियर डिझाइन केले आहे.
- New Tata Nexon EV: Tata Motors एक नवीन कार लाँच करणार आहे, जी नवीन Tata Nexon असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक कार 6 एप्रिलला लाँच होऊ शकते आणि त्यात एक मोठा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ही कार सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. तसेच या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि नवीन बंपर पाहायला मिळेल. यामध्ये नवीन इंटीरियरही पाहायला मिळणार आहे.
- Mercedes EQS EV : लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज एप्रिलमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार मर्सिडीज EQS EV सादर करण्यास सज्ज आहे. कंपनी ही कार 19 एप्रिलला लॉन्च करणार आहे. ही थ्री रो एसयूव्ही असू शकते.
- New Maruti XL 6: मारुती XL 6 नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप या कारच्या लॉन्चिंगची माहिती दिलेली नाही. या कारला अपडेटेड फ्रंट ग्रिल, बंपर आणि अनेक नवीन फीचर्स मिळतील. तसेच, याचं इटीरियर देखील नवीन डिझाइनमध्ये सादर केलं जाऊ शकतं.
इतर बातम्या
कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार
भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ
नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स