Royal Enfield 650 cruiser ची रोड टेस्ट सुरु, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या किंमत फीचर्स

Royal Enfield कंपनी लवकरच भारतात तीन नव्या बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक बाईक लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

Royal Enfield 650 cruiser ची रोड टेस्ट सुरु, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या किंमत फीचर्स
रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:27 PM

मुंबई : देशातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield) बाजारात नवनव्या बाईक्स दाखल करण्याचा धडाका लावला आहे. ग्राहकांची बदलती आवड विचारात घेत कंपनी अद्ययावत बाईक्स बाजारात आणणार आहे. देशाच्या रस्त्यांवर लवकरच रॉयल एनफील्डच्या तीन नव्या बाईक्सची एण्ट्री होणार आहे. अलीकडेच कंपनीच्या चाचणीदरम्यान रस्त्यावर नवीन बाईक्सचा शानदार लूक दिसला. या बाईक्स सध्याच्या कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650 सारख्या 650 सीसी प्लॅटफॉर्मवर आधारित असतील. (Upcoming Royal Enfield flagship 650cc cruiser continues testing, will launch soon)

लीक झालेल्या फोटोंमधून अशी माहिती मिळाली आहे की, रॉयल एनफील्ड 650 सीसी क्रूझरमध्ये फॉरवर्ड सेट फुटपेग्स दिले जातील, जे यापूर्वी मीटियर 350 मध्ये पाहायला मिळाले होते. त्याच वेळी, मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशासाठी बॅकरेस्ट देण्यात आला आहे, जी एक पर्यायी अॅक्सेसरी आहे. कन्व्हेन्श्नल क्रूझरप्रमाणेच यामध्येही तुम्हाला एक लांब व्हीलबेस मिळेल, ज्याची सीट थोडी खाली असेल.

सध्या कंपनी 650 सीसी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन मॉडेल्सची चाचणी करीत आहे. अशा परिस्थितीत, 650 सीसी रोडस्टर काही दिवसांपूर्वी रोड टेस्टदरम्यान पाहायला मिळाली. ही बाईक क्लासिक 650 म्हणून सादर केली जाऊ शकते. रॉयल एनफील्ड फ्लॅगशिप क्रूझर या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते, या बाईकची किंमत 3 लाख रुपये असू शकते.

रॉयल एनफील्डच्या आगामी काळात लाँच होणाऱ्या बाईक्समध्ये 650 Cruiser आणि इंटरसेप्टर 650 या बाईक भारतीय ग्राहकांना सर्वात जास्त आवडतील, असं म्हटलं जात आहे. या बाईक यापूर्वी अनेकदा रोड टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाल्या आहेत. अशातच आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये 650 Cruiser च्या ग्राऊंड क्लियरन्सबद्दल माहिती मिळत आहे.

कशी असेल नवीन 650 Cruiser

नवीन मोटरसायकल्स रॉयल एनफील्डच्या 650 सीसी इंजिनसह सुसज्ज आहेत. 650 सीसी क्रूझर मोटारसायकल्समध्ये अपसाइड फ्रंट फॉर्क व मागील बाजूस दोन शॉक अ‍ॅब्जॉर्बर असतील. बाईक्सच्या पुढच्या बाजूला 19 इंचाची चाके आणि मागील बाजूस 17 इंचाची चाके देण्यात आली आहेत. नुकत्याच पुढे आलेल्या व्हिडिओमध्ये 650 सीसी बाईकचा अत्यंत प्रीमियम लूक आहे. लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बाईकची बॉबर स्टाईल तयार केली आहे. ब्रेकिंगसाठी बाईकला दोन्ही बाजूंनी डिस्क ब्रेक आणि स्टँडर्ड ड्युअल चॅनेल एबीएस मिळेल. नवीन मोटरसायकलला सेमी-डिजिटल इंन्स्ट्रूमेंट कन्सोल, तसेच ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम आणि स्लिपर क्लचदेखील मिळेल.

हेही वाचा

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

1 लीटर पेट्रोलमध्ये 99 किलोमीटर धावणार, Bajaj, Hero च्या ‘या’ बजेट बाईक्स

पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक

(Upcoming Royal Enfield flagship 650cc cruiser continues testing, will launch soon)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.