Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेहिकल फिटनेस टेस्टिंगशी संबंधित नियमांत बदल, सरकारने सूचना मागवल्या

वाहनांच्या फिटनेस टेस्टसाठी (Vehicle Fitness) ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (ATS) स्थापन करण्यासाठी सरकारने पात्रता निकषांमध्ये काही सुधारणा सुचवल्या आहेत. याअंतर्गत एका राज्यात नोंदणीकृत वाहनांची चाचणी दुसऱ्या राज्यात सक्षम करायची आहे. यासोबतच वाहनांची वेळ संपल्याचेही केंद्रांना जाहीर करावे लागणार आहे.

वेहिकल फिटनेस टेस्टिंगशी संबंधित नियमांत बदल, सरकारने सूचना मागवल्या
वाहन रजिस्टर करण्यात आलेल्या राज्यांच्या बाहेरही फिटनेस टेस्ट करता येईल.
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 1:30 PM

नवी दिल्ली : वाहनांच्या फिटनेस टेस्टसाठी (Vehicle Fitness) ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (ATS) स्थापन करण्यासाठी सरकारने पात्रता निकषांमध्ये काही सुधारणा सुचवल्या आहेत. याअंतर्गत एका राज्यात नोंदणीकृत वाहनांची चाचणी दुसऱ्या राज्यात सक्षम करायची आहे. यासोबतच वाहनांची वेळ संपल्याचेही केंद्रांना जाहीर करावे लागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) 25 मार्च 2022 रोजी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्सची मान्यता, नियमन आणि नियंत्रण यासाठी नियमांमध्ये काही सुधारणा करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी ते 23 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झाले होते.

काही किरकोळ बदल देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत, जे एटीएसमध्ये स्थापित करायच्या चाचण्यांची यादी आणि उपकरणांचे विशिष्ट तपशील प्रदान करतात, असे निवेदनात म्हटले आहे. फिटनेस चाचणीचे निकालही ऑटोमॅटिक करण्यात आले आहेत जेणेकरून त्यात कोणत्याही गैरप्रकारांना वाव राहणार नाही. फिटनेस टेस्टमध्ये, वाहनांची तपासणी करण्याचे सिग्नल मशीनद्वारे थेट सर्व्हरवर पाठवले जातील.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचणीसाठी नवीन उपकरणे जोडली

इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचणीसाठी काही नवीन उपकरणेही जोडण्यात आली आहेत. चाचणी परिणामांसाठी प्रमाणित स्वरूप जोडले (Standardized format for Test Results has been added) गेले आहे. त्याचा उद्देश वाहनांच्या मालकांना सुविधा प्रदान करणे आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देणे हा आहे. सर्व भागधारकांच्या टिप्पण्या आणि सूचनांसाठी अधिसूचना 30 दिवसांसाठी सार्वजनिक डोमेनमध्ये असेल.

पुढील वर्षी 1 एप्रिलपासून वाहनांची फिटनेस टेस्ट होणार

पुढील वर्षी एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने ATS मार्फत वाहनांची फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्याची सरकारची योजना आहे. आवश्यकता टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, 1 एप्रिल 2023 पासून एटीएसमार्फत अवजड मालवाहू वाहने आणि अवजड प्रवासी मोटार वाहनांसाठी फिटनेस टेस्ट अनिवार्य असेल. मालवाहतूक करणारी मध्यम आकाराची वाहने (मीडियम गुड्स व्हीकल्स), प्रवासी वाहतूक करणारी मध्यम आकाराची वाहने (मीडियम पॅसेंजर मोटर व्हीकल्स), हलकी मोटार वाहने (लाइट मोटर व्हीकल्स – वाहतूक) यांच्या बाबतीत, 1 जून 2024 पासून आवश्यकता अनिवार्य केली जाईल.

गेल्या वर्षी, मंत्रालयाने म्हटले होते की, विशेष उद्देश वाहने, राज्य सरकारे, कंपन्या, संघटना आणि व्यक्तींच्या संस्थांना वैयक्तिक आणि वाहतूक वाहनांच्या फिटनेसची टेस्ट घेण्यासाठी एटीएस उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. नूतनीकरणाच्या (रिन्यूअल) वेळी (15 वर्षांनंतर) वैयक्तिक वाहनासाठी (Non-Transport) फिटनेस चाचणी केली जाते.

सर्कुलर इकोनॉमीला चालना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय वाहन स्क्रॅपेज धोरण (National Vehicle Scrappage Policy) लाँच केले आणि ते म्हणाले होते की, हे धोरण प्रदूषणकारी वाहने टप्प्याटप्प्याने दूर करण्यात मदत करेल आणि सर्कुलर इकोनॉमीला चालना देईल. वाहन स्क्रॅपेज धोरण 1 एप्रिल 2022 पासून लागू होईल.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.