नवी दिल्ली : नविन गाडी खरेदी करताना जुनी गाडी स्क्रॅप न करणाऱ्यांना आता अतिरिक्त कराचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प 2021-22 मध्ये स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरणाची घोषणा करण्यात आली. या योजनेमुळे वाहन उद्योगाला उभारी मिळेल, असे म्हटले जाते. येत्या काळात वाहन उद्योगात 30 टक्के वाढ होऊन 10 लाख कोटी रुपये होईल, असेही गडकरी म्हणाले. नवी वाहने खरेदी करताना जुनी वाहने स्क्रॅप केल्यास खरेदीवर अनेक लाभ देण्याचीही घोषणा करण्यात आली. (vehicle scrappage policy)
स्क्रॅपेज धोरण फायदेशीर ठरेल. यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेलच, मात्र त्यासोबत प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरणानुसार खासगी वाहनांची 20 वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल, असेही गडकरींनी नमूद केले. लवकरच स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरण राबवण्यात येईल. जे लोक या धोरणाचा अवलंब करणार नाहीत त्यांच्या वाहनांवर हरित कर आणि अन्य कर आकारण्यात येतील. तसेच अशा वाहनांना ‘ऑटोमेडेट फिटनेस टेस्ट’ ही करावी लागेल.
वाहन स्क्रॅपेज धोरण अधिक फायदेशीर आहे. हे धोरण अनिवार्य आहे. सर्व वाहनांची ‘ऑटोमेडेट फिटनेस टेस्ट’ करावी लागेल. यामध्ये मानवी हस्तक्षेप नसेल. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा आकड्यांमध्ये गडबड केली जाऊ शकत नाही.(vehicle scrappage policy)
India vs England 1st Test, 3rd Day Live | चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतमध्ये 5 व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीhttps://t.co/wV4h1c4a5C
| #TeamIndia | #IndiavsEngland | #Bcci | #JoeRoot | #INDvsENG | #ENGvIND | #Gill |— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
संबंधित बातम्या
जुनी वाहनं स्क्रॅप करण्यासाठी सरकार प्रोत्साहन निधी देणार
बंपर ऑफर! 1 लाखाची बाईक फक्त 40 हजारात