जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

वाहनांवरही आता एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. देशभरात जुनी वाहनं कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेलं केंद्र सरकार अशा प्रकारची योजना बनवत आहे.

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 3:39 PM

नवी दिल्ली : हल्ली एक्सचेंज ऑफरवर अनेक वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. त्यातही प्रामुख्याने मोबाईल, लॅपटॉप्सच्या खरेदीदरम्यान कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्सचेंज ऑफर्स देतात. अशी एक्सचेंज ऑफर आता वाहनांवरही (exchange offer on vehicle) मिळणार आहे. देशभरात जुनी वाहनं कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेलं केंद्र सरकार अशा प्रकारची योजना बनवत आहे. जे ग्राहक जुन्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करतील त्यांना नव्या वाहनाच्या खरेदीवर विशेष सूट मिळणार आहे. (Vehicle Scrappage Policy : Replace the old car with a new one, Special discount from government)

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ऑटो कंपन्यांनी जुन्या वाहनांच्या बदल्यात नव्या वाहनावर 1 टक्के सूट देण्यास संमंती दर्शवली आहे. जुनी वाहने पूर्णपणे बंद करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

3 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

नितीन गडकरी यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरसोबत (सियाम) झालेल्या बैठकीत, ऑटो कंपन्यांकडे नव्या वाहनांवर 3 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव मांडला होता. बऱ्याच चर्चेनंतर कंपन्यांनी 1 टक्के सूट देण्यास संमती दिली आहे.

फेस्टिव्ह सीजनमध्ये नवी पॉलिसी लागू होणार नाही

सध्याच्या फेस्टिव्ह सीजनमध्ये ही नवी पॉलिसी लागू करु नये, अशी ऑटो कंपन्यांची मागणी आहे. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोटार कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या महिन्याभरात मार्केट थोडंफार स्थिर होऊ लागलं आहे. त्यामुळे आत्ताच नवी पॉलिसी लागू करु नये, असं कंपन्यांचं म्हणणं आहे.

सरकार वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी बनवतंय

सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये डिझेलवर चालणाऱ्या 10 वर्ष जुन्या गाड्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या 15 वर्ष जुन्या गाड्या दिल्ली-एनसीआर भागात चालवण्यास मनाई केली होती. त्यानंतर सरकार जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याचा प्लॅन करत आहे.

जुन्या गाड्यांचं काय करायचं?

स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये 15 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या रस्त्यांवरुन हटवण्याची तरतूद होती, ती आता रद्द करण्यात आली आहे. परंतु अशा जुन्या गाड्या चालवायच्या असतील तर त्या गाडीच्या मालकाला दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. तसेच रजिस्ट्रेशन रिन्यू (नूतनीकरण नोंदणी) करावी लागेल. रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठीचे शुल्क तिप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे जुनी वाहनं वापरत असलेल्या वाहनधारकांना नवीन वाहन घेणं अधिक सोयीस्कर वाटेल. परिणामी रस्त्यांवर नवी वाहने धावतील.

टॅक्समध्ये सूट देण्याची योजना

संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, मोटार कंपन्यांची अशी मागणी आहे की, नवीन पॉलिसी काही दिवसांसाठी पुढे ढकलावी, जेणेकरुन आगामी फेस्टिव्ह सीजनमध्ये होणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच केंद्र सरकार जे वाहनधारक त्यांचे जुने वाहन स्क्रॅप करुन नवीन वाहन घेतील, अशा वाहनधारकांसाठी नव्या वाहनाच्या खरेदीदरम्यान रजिस्ट्रेशन चार्ज आणि रोड टॅक्समध्ये (Road Tax) सूट देण्याची योजना आखत आहे.

संबंधित बातम्या

विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास Driving License निलंबित होणार

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

(Vehicle Scrappage Policy : Replace the old car with a new one, Special discount from government)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.