मुंबई : दुचाकी उत्पादक कंपनी पियाजिओ (Piaggio) 19 ऑगस्ट रोजी नवीन स्कूटर Vespa 75th एडिशन लाँच करणार आहे. या स्कूटरच्या लॉन्चिंगच्या तारखेव्यतिरिक्त कंपनीने आतापर्यंत याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. Vespa 75th एडिशन व्यतिरिक्त, कंपनी निवडक आंतरराष्ट्रीय बाजारात इतर विशेष स्कूटर विकते, ज्यामध्ये Vespa Primavera 150 चा समावेश आहे. (Vespa 75th edition is ready to launch on 19 august in India)
कंपनीने अलीकडेच नवीन 2021 Vespa Primavera 75th Anniversary आणि 2021 2021 Vespa GTS 75th Anniversary मलेशियात लाँच केली आहे. भारतात लॉन्च होणाऱ्या Vespa 75th एडिशन स्कूटरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
वेस्पा 75th बद्दल बोलायचे झाल्यास, या स्कूटरच्या बॉडी पॅनवर ’75’ क्रमांक लिहिला असेल, जो कंपनीची 75 वी अॅनिव्हर्सरी साजरी करेल. यासह, या मॉडेलच्या टेलवर एक मोठी गोलाकार बॅग देखील दिसू शकते जी मलेशियातील वेस्पा 75th स्कूटरवर पाहायला मिळाली होती. बॅग वेल्वेटी-सॉफ्ट नुबक लेदरपासून बनविली आहे, ज्यामध्ये सॅडलप्रमाणे पेंट थीम मिळेल. सोबतच लगेज रॅकवर या बॅगमध्ये एक शोल्डर स्ट्रॅप आणि एक क्लिप मिळेल.
या स्कूरटच्या रंगांबद्दल बोलायचे झाल्यास, अशी अपेक्षा आहे की, या स्कूटरला एक विशेष “Giallo 75th” कलर स्कीम मिळू शकेल जी मूळ मॉडेल्सच्या रंगीत थीमने प्रेरित आहे. यासह, बॅजवर क्रोम-प्लेटेड डिटेल्स, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट मडगार्ड, मफलर आणि रियर-व्ह्यू मिरर्स मिळतील.
या स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्पा 75th एडिशनची किंमत याच्या स्टँडर्ड व्हर्जनपेक्षा जास्त असेल. वेस्पाने गेल्या 75 वर्षात एकूण 19 मिलियन स्कूटर तयार केल्या आहेत. 19 मिलियनवी स्कूटर कंपनीच्या पॉन्टीडेरा प्लांटमध्ये रोलआऊट करण्यात आली होती जी GTS 300 होती.
इतर बातम्या
जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास
‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल
(Vespa 75th edition is ready to launch on 19 august in India)