Vinfast VF3 | काय तो लूक, 200 किमीची रेंज, भारतात या इलेक्ट्रिक एसयुव्हीची येणार लाट

Vinfast VF3 | देशात इलेक्ट्रिक कारचे युग अवतरले आहे. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने आघाडी घेतली आहे. तर एमजी हेक्टरने स्वस्तात इलेक्ट्रिक कार आणून बाजारात स्पर्धा तीव्र केली आहे. पण आता Vinfast VF3 ही कंपनी कमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. या कंपनीची एसयुव्ही सर्वात स्वस्त ठरेल.

Vinfast VF3 | काय तो लूक, 200 किमीची रेंज, भारतात या इलेक्ट्रिक एसयुव्हीची येणार लाट
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 3:40 PM

नवी दिल्ली | 5 March 2024 : तर भारतात इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी लवकरच उपलब्ध होईल. विनफास्ट ही कंपनी भारतीय बाजारात धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या इराद्याने उतरत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही कंपनी विनफास्ट टॉप-डाउन अप्रोचसह सुरुवात करेल. कंपनी लवकरच एक एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत उतरविण्याच्या तयारीत आहे. Vinfast VF3 Electric SUV सारखेच हे मॉडेल असेल. VF3 एक छोटी इलेक्ट्रिक एसयुव्ही आहे. पण ती एमजी कॉमेटपेक्षा मोठी आहे.

कशी आहे कार

VF3 एसयुव्हीची लांबी 3,114 मिमी आहे. यामध्ये 16 इंच व्हील्स आहेत. या कारचा ग्राऊंड क्लिअरंस पण चांगला आहे. या कारची स्टाईल कॉम्पॅक्ट आहे. या कारमध्ये इतर विनफास्ट मॉडलपेक्षा एक नवीन ग्रिल देण्यात आले आहे. 10-इंचच्या टचस्क्रीनसह खाली क्लायमेट कंट्रोल बटण देण्यात आले आहे. या कारचे इंटिरिअर साधं पण एकदम खास आहे. कॉम्पक्ट बॉडी असली तरी VF3 ची बूट स्पेस क्षमता 550 लिटर आहे. VF3 साठी कंपनीने अधिकृतरित्या 200 किमी रेंजचा दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

भारतात मॉडेल कोणते?

  • तर भारतात VF3 चे मॉडेल कसे असणार याविषयीचं गुपीत कायम आहे. कंपनीने त्याविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. पण ही कार स्वस्त ठेवण्यासाठी कंपनीला बरेच बदल करावे लागणार आहे. तामिळनाडू येथे कंपनीचा मोठा प्लँट आहे. तिथून देशभरात ही कार पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. याच ठिकाणी लवकरच उत्पादनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कारची काय किंमत असेल याविषयी अजून खुलासा झालेला नाही. पण एका अंदाजानुसार, फिचर असलेली कार महाग असू शकते. तर एक बजेट मॉडेल पण बाजारात येऊ शकते. VF3 कार ची 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमती असू शकते.

  • कंपनीला बाजारात टियागो ईव्ही आणि एमजी कॉमेटला विनफास्ट टफ फाईट देऊ शकते. सध्या VF3 च्या लूकने अनेकांना भारावून टाकले आहे. कारची रेंज पण दमदार आहे. त्यामुळे ही कार स्पर्धेत मोठा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. कंपनी इतर पण मॉडेल बाजारात आणू शकते. ही कंपनी व्हिएतनामची आहे.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....