Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Volkswagen च्या लोकप्रिय Polo आणि Vento चं टर्बो एडिशन लाँच, स्पोर्टी लुकसह किंमतही कमी

फॉक्सवॅगन (Volkswagen) कंपनीने सोमवारी भारतात त्यांचे प्रमुख मॉडल्स पोलो (Polo) आणि वेंटो (Vento) चं ‘टर्बो वेरिएंट’ लाँच केलं आहे.

Volkswagen च्या लोकप्रिय Polo आणि Vento चं टर्बो एडिशन लाँच, स्पोर्टी लुकसह किंमतही कमी
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 12:56 PM

मुंबई : फॉक्सवॅगन (Volkswagen) कंपनीने सोमवारी भारतात त्यांचे प्रमुख मॉडल्स पोलो (Polo) आणि वेंटो (Vento) चं ‘टर्बो वेरिएंट’ लाँच केलं आहे. नवीन टर्बो एडिशन पोलो (Turbo Edition Polo) या कारची किंमत 6.99 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर टर्बो वेंटोची (Turbo Edition Vento) किंमत 8.69 लाख रुपये (दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे. (Volkswagen Launches Polo, Vento Turbo Edition at low price)

फॉक्सवॅगनच्या अधिकृत वेबसाईटवर आणि कंपनीच्या डीलरशिपकडे नव्या पोलो आणि वेंटोच्या टर्बो एडिशनसाठीचं बुकींग सुरु करण्यात आलं आहे. पोलो आणि वेंटोचं नवीन टर्बो एडिशन कम्फर्टलाइन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कार्स फॉक्सवॅगनच्या 1.0l टर्बोचार्ज्ड स्ट्रॅटिफाईड इंजेक्शन (टीएसआय) इंजिन द्वारे संचालित आहे. जे 6-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनसाठी तयार करण्यात आलं आहे. हे इंजिन 5000-5500 आरपीएम वर 81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 1750-4000 आरपीएमवर 175Nm टॉर्क जनरेट करु शकतं.

फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता या दोन गाड्यांबाबतची घोषणा करताना म्हणाले की, “ग्राहकांना एक्सेसिबिलिटी आणि सुरक्षित जर्मन-इंजिन असलेली वाहनं प्रदान करणे हे फोक्सवॅगनचं मुख्य उद्धीष्ट आहे. त्यानुसार आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. ग्राहकांच्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून आम्ही पोलो आणि वेंटोचं टर्बो एडिशन सादर केलं आहे. ही वाहनं भारतीय ग्राहकांना आकर्षित करतील.

दोन्ही कार्सच्या टर्बो एडिशनमध्ये ग्लॉसी ब्लॅक स्पॉयलर, ORVM कॅप्स, फेंडर बॅज आणि स्पोर्टी सीट कवर्ससह नवीन फीचर्स सादर करण्यात आले आहेत. पोलो आणि वेंटा ज्या रंगांसह सादर करण्यात आल्या होत्या त्या सर्वच रंगांमध्ये या दोन्ही कार्सचं टर्बो एडिशन उपलब्ध आहे.

हेही वाचा

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन

एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास?

(Volkswagen Launches Polo, Vento Turbo Edition at low price)