Volkswagen Experience : महाबळेश्वरातील 5000 वर्षांपूर्वीचे डोळ्याचे पारणे फेडणारे अनोखे मंदिर, तुम्ही पाहिलंय का?

Volkswagen Experience Mahabaleshwar : महाभारत काळात जेव्हा पांडवांना वनवास आणि अज्ञातवासाची शिक्षा मिळाली, तेव्हा ते देशातील कानाकोपऱ्यात पोहचले. त्यांच्या या प्रवासाची चिन्हं मंदिर रुपाने जीवंत आहेत. Volkswagen Experience मध्ये पांडवकालीन असंच हे डोळ्याचं पारणं फेडणारं महाबळेश्वर येथील मंदिर...

Volkswagen Experience : महाबळेश्वरातील 5000 वर्षांपूर्वीचे डोळ्याचे पारणे फेडणारे अनोखे मंदिर, तुम्ही पाहिलंय का?
फॉक्सवॅगन टॅगूनमुळे प्रवास सुसह्य
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:26 PM

Volkswagen Experience Mahableshwar Drive by Taigun : भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काही ना काही हटके, खास दृष्टीला पडतेच. महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत अथांग असा पश्चिम घाट एखाद्या महापुरूषा सारखा थाटात उभा आहे. मुंबईपासून अगदी जवळ हिरव्यागार दुलईत समावलेले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर असेच एक वेगळं ठिकाण आहे. महाभारत काळात जेव्हा पांडवांना वनवास आणि अज्ञातवासाची शिक्षा मिळाली, तेव्हा ते देशातील कानाकोपऱ्यात पोहचले. त्यांच्या या प्रवासाची चिन्हं मंदिर रुपाने जीवंत आहेत. Volkswagen Experience मध्ये 5000 वर्ष जूने पांडवकालीन असंच हे डोळ्याचं पारणं फेडणारं महाबळेश्वर येथील मंदिर आहे, तुम्ही ते पाहिले आहे का?

महाबळेश्वर हे मुंबई आणि पुण्याजवळील हिल स्टेशन म्हणून कित्येक दशकांपासून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटक दूर वरून भेट द्यायला येतात. या ठिकाणी 5000 वर्ष जुने पांडवकालीन मंदिर आहे. ही एक अनोखी शिल्पकृती म्हटलं तर वावगं ठरू नये. या ठिकाणी पोहचण्यासाठी अर्थात आमची VW Taigun आमच्या मदतीला धावली.

5000 वर्ष जुने पांडव मंदिर

हे सुद्धा वाचा

महाबलेश्वरमध्ये व्ह्यू पॉईंट आणि इतर ठिकाणं असली तरी पांडवकालीन मंदिराचं आकर्षण विशेष असल्याने आमचा मोर्चा तिकडंच वळला. काही जण या मंदिराला कृष्णाई मंदिर तर काही जण पांडव मंदिर असे ओळखतात. हे मंदिर जवळपास 5,000 वर्ष जुने असल्याचा दावा करण्यात येतो. या मंदिराला पाहता क्षणीच आपण त्याच्या प्रेमात पडतो. त्याला कोणतेच मापदंड लावण्याच्या फंदात आपण पडत नाही. त्याचे खास डिझाईन, आकार, त्याची एक खास कोनातील मांडणी हे तुम्हाला मोहून टाकते.

या ठिकाणचै वैशिष्ट्ये म्हणजे ही जागा, अव्यावसायिक आहे. येथे ना तुम्हाला फुल विक्रेता दिसेल ना कोणी प्रसाद विक्रेता. तर मंदिरात तुम्हाला पुजारी पण बसलेला दिसणार नाही. येथे प्रवेशासाठी एक रुपयांचे तिकीट तेवढे घ्यावे लागते. ही जागा अनेकांना माहिती असली तरी इकडे गर्दीचा रतीब नाही. हे मंदिराशी लोकांच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. हे 5000 वर्षांपूर्वीचे मंदिर अभियंत्यासाठी शिल्पकलेचा एक अद्भूत नजारा आहे. त्याचा आकार, त्याची बांधणी ही आताच्या स्थापत्य शास्त्रासाठी अभ्यासाचा विषय आहे. दगडावर दगड रचत त्याची निर्मिती केली आहे. जणू काही हे हेमांडपंथी मंदिर आहे.

फॉक्सवॅगन टॅगूनमुळे प्रवासांचे अनुभवले थ्रील

मंदिरात पोहचण्यासाठी अर्थात फॉक्सवॅगन टॅगून हा प्रवासातील सच्चा साथी होता. जगातील सर्वात जुनं स्थापत्य शास्त्र पाहण्यासाठी आम्ही फॉक्सवॅगनच्या रुपाने मॉर्डन इंजिनिअरिंगचा आधार घेतला. फॉक्सवॅगनमद्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा खास ताळमेळ दिसतो. महाबळेश्वर हे डोंगरदऱ्यातील ठिकाण आहे. अशावेळी फॉक्सवॅगन टॅगून केवळ महामार्गावरच नाही तर अशा हिली एरियात, डोंगरदऱ्यात पण सुसाट धावते. या कारची खरी परीक्षा ही अशा भागातच होते. तेव्हाच कळते ही कार किती टॉर्क देते. कार वरचढताना त्रास देते का? जास्त आवाज करते का? दम तोडते का? या सर्व चाचण्या अशा डोंगराळ भागात सहज लक्षात येतात. टॅगून ही या सर्व कसोट्यांवर अगदी प्रामाणिक ठरली, खरी उतरली हे सांगायला संकोच कसला. तुम्ही कार तर कोणतीही खरेदी करू शकता, पण ज्याची कामगिरी दमदार तोच खरा प्रवासातील सच्चा मित्र असतो, जसा की फॉक्सवॅगन टॅगून, नाही का?

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.