या महिन्यात तीन नव्या SUV लाँच होणार, जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट कार कोणती?

देशातील आघाडीच्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या 2021 मध्ये एसयूव्ही कार्स लाँच करण्याचा धडाकाच लावणार आहेत.

या महिन्यात तीन नव्या SUV लाँच होणार, जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट कार कोणती?
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 9:06 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतात एसयूव्हींना जबरदस्त मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यांनी भारतात 2020 मध्ये बऱ्याच एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केल्या. देशातील आघाडीच्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या 2021 मध्ये एसयूव्ही कार्स लाँच करण्याचा धडाकाच लावणार आहेत. भारतात SUV सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाय आणि किआ मोटर्स या दोन कंपन्यांची स्थिती मजबूत आहे. या कंपन्यांना मारुती, महिंद्रा, टाटा या भारतीय कंपन्या टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. तसेच निसान, जीप, स्कोडा, फोर्ड आणि रेनॉ भारतात नव्या एसयूव्ही लाँच करणार आहेत. दरम्यान, या महिन्यात Volkswagen, Ford आणि Skoda या तीन परदेशी कंपन्या भारतीय बाजारात तीन नव्या एसयूव्ही लाँच करणार आहेत. (Volkswagen Tiguan, Ford Ecosport SE and Skoda Kushaq to be launched in March 2021)

Volkswagen Tiguan

भारतीय मार्केटमधील स्वतःची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी कार निर्मिती करणारी कंपनी फोक्सवॅगनने (Volkswagen) या दोन-तीन वर्षांमध्ये चार नव्या एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा केली होती. कंपनीने त्यापैकी दोन नव्या गाड्या T-ROC मिड साइज प्रिमियम एसयूव्ही आणि Tiguan AllSpace गेल्या लाँच केल्या. त्यानंतर आता कंपनी अजून दोन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

कंपनीने दावा केला आहे की, नवीन Taigun स्टायलिंग, टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या बाबतीत मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटचं रि-डिफाईन व्हर्जन असेल. या कारला 1.0 लीटर, 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लीटर TSI EVO इंजिनासह सादर केलं जाऊ शकतं. 1.0 लीटर इंजिनमध्ये 115bhp इतकी पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. तर 1.5 लीटर इंजिनमध्ये 148bhp पाॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फोक्सवॅगन 2021 च्या पहिल्या सहामाहित Taigun मिड-साईज एसयूव्ही लाँच करणार आहे. चौथी एसयूव्ही कधी लाँच केली जाणार आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु 2021 च्या दुसऱ्या सहामाहित दुसरी एसयूव्ही लाँच केली जाऊ शकते. दरम्यान सध्या अशा चर्चा आहेत की, फोक्सवॅगन कंपनी ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue), किया सोनेट (Kia Sonet), टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि फोर्ड इकोस्पोर्टसारख्या (Ford EcoSport) गाड्यांच्या स्पर्धेत सब-4 सीटर एसयूव्ही लाँच करु शकते.

Ford Ecosport SE

अलीकडेच ही एसयूव्ही (Ford Ecosport SE) फोर्डच्या शोरूम्समध्ये पाहायला मिळाली आहे. ही एसयूव्ही फोर्ड इकोसपोर्टचं (Ford Ecosport) स्वस्त व्हेरिएंट असेल. या कारच्या रियर लुकमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच या कारची नंबर प्लेट टेलगेटच्या मध्यभागी दिली आहे. तसेच, टेलगेटवर कोणतंही अतिरिक्त स्पेयर व्हील उपलब्ध नसेल. याचाच अर्थ असा आहे की, कंपनीच्या भारतात लाँच होणाऱ्या कारच्या मागील बाजूला दिलं जाणारं स्पेयर व्हील दिलं जाणार नाही.

Ford Ecosport SE ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांमध्ये लाँच होईल. या कारच्या पेट्रोल मॉडेलमध्ये 1.5 लीटर नॅचुरली एस्पीरेटेड इंजिन मिळेल, जे 121bhp पॉवर आणि 149Nm टॉर्क जनरेट करेल. त्याच वेळी, डिझेल मॉडेलला 1.5 लिटर इंजिन मिळेल जे 99bhp पॉवर आणि 215Nm टॉर्क जनरेट करेल. याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि इतर प्रकारांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.

Skoda Kushaq

Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक (Skoda Kushaq) असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. कुशक या शब्दाचा अर्थ आहे शासक, सम्राट किंवा राजा. ही व्हीकल मार्केटमध्ये ह्युंदाय क्रेटा आणि किया सेल्टॉस या गाड्यांना टक्कर देणार आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. दरम्यान, ही कार 18 मार्चला लाँच केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे. ही कार फोक्सवॅगन ग्रुपच्या ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली कार आहे.

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार असेल ज्यामध्ये MySkoda Connect टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली जाणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले जाणार आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) असतील. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं जाईल. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले जातील.

दरम्यान,कंपनीने म्हटलं आहे की, कुशक ही कार यावर्षी भारतात लाँच केली जाईल. ही कार 93 टक्के भारतीय बनावटीची आहे. कारण या कारमधील 93 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आले आहेत, अगदीच काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. कंपनीने या व्हीकलच्या इंजिन ऑप्शन्स आणि डायमेंशनसह कम्फर्टवर बरंच काम केलं आहे. स्कोडा कुशक MQB-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 2651 मिमीचं व्हीलबेस असेल जे स्कोडा कॉन्सेप्टच्या व्हीलबेसच्या तुलनेत 20 मिमी लहान आहे. कुशकच्या टॉप-एंड ट्रिम्समध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डे टाईम रनिंग लाइट्सची (डीआरएलएस) सुविधा असेल. टेल आणि ब्रेक लाइट्सही देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या

9 मार्चला नव्हे ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace, बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी

(Volkswagen Tiguan, Ford Ecosport SE and Skoda Kushaq to be launched in March 2021)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.