Ola S1 Air vs Honda Activa 6G यापैकी एक निवडायची आहे? मग ही बातमी वाचा

ओला एस 1 एअर आणि होंडा अॅक्टिव्हा 6जी या दोन्ही स्कुटर्संना ग्राहकांची पसंती मिळेत. या दोन्ही गाड्यापैकी एकाची निवड करायची असल्यास तुम्ही यातील फरक जाणून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला गाडी निवडणं सोपं होईल.

Ola S1 Air vs Honda Activa 6G यापैकी एक निवडायची आहे? मग ही बातमी वाचा
Ola S1 Air vs Honda Activa 6G कोणती स्कुटर ठरेल बेस्ट? किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:37 PM

मुंबई : भारतीय बाजारात आता स्कुटरची काही कमी आहे. कंपन्यांनी ग्राहकांची गरज ओळखून आपल्या स्कुटर बाजारात लाँच केल्या आहेत. ग्राहकही आपल्या खिशाला परवडतील किंवा चांगले फीचर्स असलेल्या स्कुटर्स निवडतात. दुसरीकडे गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक स्कुटरचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे इंधन की इलेक्ट्रिक स्कुटर निवडावी प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आज आम्ही तुम्हाला ओला एस 1 एअर आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा 6जी या दोन गाड्यांबाबत सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला यापैकी योग्य निवड करता येईल. ओला इलेक्ट्रिक ही भारतीय कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर आपले पाय घट्ट रोवले आहेत. मागच्या पाच महिन्यात या कंपनीच्या गाड्यांना चांगली मागणी आहे. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 18000 युनिट्सची विक्री केली आहे. दुसरीकडे, होंडा अ‍ॅक्टिव्हाची मागणीही जबरदस्त आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीने 96,451 युनिट्सची विक्री केली आहे. यावरून या दोन्ही कंपन्यांच्या गाड्यांची लोकप्रियता दिसते.

Ola S1 Air vs Honda Activa 6G फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत ओला एस 1 एअर ही अ‍ॅक्टिव्हा 6जी पेक्षा उजवी ठरते. दोन्ही गाड्यांमध्ये सीबीएस, टेलिस्कोपिक फोर्क आणि एलईडी हेडलाइटसह ड्रम ब्रेक दिले आहेत. पण ओला स्कूटरमध्ये ब्लूटूथ,नेव्हिगेशन आणि म्युझिक प्लेबॅक, राइडिंग मोड, रिव्हर्स मोडसह 7-इंच टचस्क्रीन देखील मिळते. दुसरीकडे, अ‍ॅक्टिव्हा 6जीच्या टॉप स्पेक H-Smart व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स, कीलेस ऑपरेशन, सायलेंट स्टार्टर आणि ऑटो स्टार्ट/स्टॉप सिस्टम मिळते.

Ola S1 Air vs Honda Activa 6G किंमत

ओला एस 1 एअरची किंमत 2kWh बॅटरी मॉडेलसाठी 84,999 रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे. तर 4kWh मॉडेलसाठी 1.10 लाख रुपये (एक्स शोरुम) मोजावे लागतील. यामध्ये FAME II सबसिडीचा समावेश आहे. पण सरकारच्या राज्यनिहाय सबसिडी आणि विमा/नोंदणी खर्च याचा समावेश नाही. दुसरीकडे अ‍ॅक्टिव्हा 6G बेस मॉडेलची किंमत 75,655 रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत 81,656 पर्यंत जाते.यामध्ये आरटीओ नोंदणी आणि विमा खर्चाचा समावेश नाही.

Ola S1 Air vs Honda Activa 6G बॅटरी आणि रेंज

ओला एस 1 एअर या स्कुटरमध्ये हब-माउंट मोटर आहे. पीक आउटपुट 6.11hp आहे. कंपनी 2kWh ते 4kWh पर्यंत तीन बॅटरीचे पर्याय देते. क्षमतेनुसार 85km ते 165km दरम्यान रेंज देत असल्याचा दावा कंपनीन करते. दुसरीकडे, होंडा अ‍ॅक्टिव्हा 109cc सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 7.84hp आणि 8.90Nm टॉर्क जनरेट करते. अ‍ॅक्टिव्हामध्ये 5.3-लीटरची इंधन टाकी मिळते. स्कूटरची रेंज 60 किमी प्रति लिटर इतका असल्याचा दावा कंपनी करते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.