Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारच्या मिटरजवळ दिसणाऱ्य वेगवेगळ्या चिन्हांचा काय होतो अर्थ? हे चिन्ह दिसल्यास लगेच व्हा सावध!

गाडी चालवताना आपल्या चेहऱ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (Instrumental Cluster light) . काही वाहनांमध्ये ते पूर्णपणे डिजिटल असते तर काही वाहनांमध्ये ते अर्धे डिजिटल आणि अर्धे अॅनालॉग असते.

कारच्या मिटरजवळ दिसणाऱ्य वेगवेगळ्या चिन्हांचा काय होतो अर्थ? हे चिन्ह दिसल्यास लगेच व्हा सावध!
वॉर्निंग लाईटImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 10:06 PM

मुंबई : आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा गाडी चालवत असतो, पण वाहन चालवण्यासोबतच आपल्याला त्याबद्दल काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागू शकते. गाडी चालवताना आपल्या चेहऱ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (Instrumental Cluster light) . काही वाहनांमध्ये ते पूर्णपणे डिजिटल असते तर काही वाहनांमध्ये ते अर्धे डिजिटल आणि अर्धे अॅनालॉग असते. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कारवर अवलंबून असते. वाहनाशी संबंधित सर्व गोष्टी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये सांगितल्या जातात. त्याच्या आत विविध प्रकारचे लाईट आणि चित्रेही वापरली जातात. हे दिवे आणि चित्रे कीही गोष्टीशी संबंधित आहेत. वाहन चालवण्याआधी, चालकाला या दिव्यांबद्दल समजते आणि वाहन चालविण्यास तयार आहे की नाही याची खात्री होते.

हे वॉर्निंग लाइट्स दिसल्यास सावध व्हा!

ऑईल प्रेशर लाईट

हा लाईट तुमच्या वाहनात दिसताच सावध व्हा. याचा अर्थ एकतर तुमच्या वाहनाच्या ऑइल प्रेशर सिस्टममध्ये काहीतरी गडबड झाली आहे किंवा तुमच्या वाहनातील इंजिन ऑइल कमी झाले आहे. यामुळे तुमच्या इंजिनला गंभीर नुकसान होऊ शकते. या प्रकरणात, आपण वाहनाच्या इंजिन ऑइलची पातळी तपासू शकता. पातळी कमी असल्यास, ऑईल टाकल्यानंतर लाईट जाईल. तरीही लाईट बंद होत नसल्यास, आपल्याला ते जवळच्या वर्कशॉपला दाखवावे लागेल.

इंजिन तापमान

हा लाईट ओव्हर हीटिंग दर्शवतो. हा लाईट येणे म्हणजे तुमच्या वाहनाचे इंजिन गरम होत आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये हे कुलंटमुळे असू शकते. परंतु इंजिन ओव्हरहाटिंगची इतर कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत, वाहनाचा एसी बंद करून, आपण काही मिनिटांसाठी हीटर चालू करू शकता. त्यामुळे प्रवाशांच्या डब्यात काही प्रमाणात उष्णता येणार आहे. पण तरीही काही फरक न पडल्यास वाहन बंद करा आणि ते थंड होईपर्यंत थांबा. असे केल्याने तुम्ही जवळच्या मेकॅनिकशी संपर्क साधू शकता. पण लक्षात घ्या की जास्त गरम झाल्यावर वाहन चालवू नका, त्यामुळे आग लागण्याचा धोकाही वाढू शकतो.

हे सुद्धा वाचा

इंजिन लाइट

हा लाईट अनेक कारणांमुळे येऊ शकतो. काहीवेळा इंधनाचे झाकण उघडे राहिल्याने देखील असे होऊ शकते. परंतु काहीवेळा त्याच्या दिसण्याचे कारण गंभीर असू शकते. असा दिवा लागल्यावर सर्वप्रथम हा लाईट चमकत आहे की सतत जळत आहे हे तपासा. जर हा चमकत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या इंजिनमध्ये काही गंभीर समस्या येणार आहे किंवा आली आहे. जर लाईट सतत चालू असेल आणि फ्लॅश होत नसेल, तर तो चेक इंजिन लाइट देखील असू शकतो.

छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.