नवी दिल्लीः वाढत्या इनपुट कॉस्टच्या कारणामुळे कार निर्मात्या कंपन्यांनी आपल्या विविध कार मॉडेलच्या किमतींमध्ये वाढ केलेली आहे. सेमीकंडक्टर चिप्समध्ये ग्लोबल शॉर्टेज असल्याने प्रोडक्शन लेव्हल कमी झालेली आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कॉस्टवर परिणाम झाला आहे. ह्युंडाई (hyundai) आपल्या कारच्या किमती वाढविणारी लेटेस्ट कंपनी आहे. कोरियन कंपनी असलेल्या ह्युंडाईने भारतातील एसयुव्ही लाइनअप गाड्यांच्या किमतींमध्ये वाढ केलेली आहे. यात, वेन्यू, क्रेटा आणि अल्कझर या कार्सचा समावेश आहे. या तीन्ही एसयुव्ही व्हर्जनच्या कार आहेत. ह्युंडाईच्या लाइनअपमध्ये सर्वात छोटी एसयुव्ही वेन्यू आहे. तसेच अल्कझर (alcazar) मिड साइजमध्ये तर क्रेटा सात सिटांची एसयुव्ही आहे. मे 2022 वेन्यूची (venue) किंमत 12100 रुपयांर्यंत वाढविण्यात आली आहे. सबकॉम्पॅक्ट एसयुव्हीची किंमत 7.11 लाख रुपयांपासून सुरु होउन 11.84 लाख रुपयांपर्यंत जाते. वेन्यूच्या एसएक्स डिझेल व्हेरिएंटला सोडून सर्वच व्हेरिएंटच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे.
वेन्यूच्या बेस ई व्हेरिएंटला सर्वाधिक म्हणजे 1.72 टक्के किंमत वाढ सोसावी लागली. सबकॉम्पॅक्ट एसयुव्हीच्या सर्वच पेट्रोल व्हेरिएंटच्या गाड्यांमध्ये 12 हजार रुपयांनी वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे डिझेल व्हेरिएंटमध्ये 12100 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. डिझेल व्हेरिएंटमध्ये 12100 रुपयांची वाढ करण्यात आली असून याला आठ ट्रिम्समध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यात, ई, एस, एस प्लस, एस(ओ), एसएक्स, एसएक्स (ओ) एक्झीक्यूटीव्ह, एसएक्स प्लस आणि एसएक्स (ओ) यांचा समावेश आहे.
कॉम्पॅक्ट सी-सेगमेंट एसयुव्हीला 21 हजार 100 रुपयांपर्यंत किमतीत वाढ झालेली आहे. बेस ई व्हेरिएंट आणि टॉप स्पेक एसएक्स (ओ) व्हेरिएंटच्या किमतीत 21 हजार रुपये आणि 21100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बाकी पेट्रोलवर चालवणार्या व्हेरिएंटच्या किमतीमध्ये समप्रमाणात 18100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. क्रेटाच्या पेट्रोल व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 10.44 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
तीन रो-मिड साइजच्या एसयुव्हीची किंमत आता पेट्रोल युनिटसाठी 16.44 लाख रुपयांपासून ते 19.95 लाख रुपये आणि डिझेल युनिटसाठी 16.85 लाख रुपयांपासून ते 19.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सर्व किमती एक्सशोरुम आहेत. डिझेल अल्कझरच्या टॉप स्पेक सिग्नेचर ट्रीमला सोडले तर सात सीटर एसयुव्हीच्या सर्वच व्हेरिएंटच्या किमतींमध्ये समप्रमाणात 10 हजार रुपयांनी वाढ झालेली आहे.