Hyundaiची नवी इलेक्ट्रिक कारचा लूक कसा असणार? कोणत्या कारसोबत स्पर्धा करणार? जाणून घ्या…

Hyundai ची ही इलेक्ट्रिक कार महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार Mahindra XUV 400 शी स्पर्धा करेल. महिंद्रानं आधीच सांगितलं आहे की ते लवकरच काही नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत.

Hyundaiची नवी इलेक्ट्रिक कारचा लूक कसा असणार? कोणत्या कारसोबत स्पर्धा करणार? जाणून घ्या...
Hyundaiची नवी कार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 11:39 AM

मुंबई : ह्युंदाई (Hyundai) लवकरच भारतीय  बाजारपेठेत (India) आपली नवीन इलेक्ट्रिक कार (New Electric Car) लाँच करू शकते. ही कार Hyundai Venue प्रमाणेच प्लॅटफॉर्म वापरेल. मात्र, बॅटरी सेटअप केल्यानंतर त्यात जास्त जागा राहणार नाही. कंपनी भारतीय बाजारात Hyundai Ionic 5 EV लाँच करण्याचा विचार करत आहे. या वर्षानंतरच ही कार भारतीय बाजार पेठेत येऊ शकते. आम्ही तुम्हाला याच नव्या कारविषयी माहिती देणार आहेत. ह्युंदाईने (Hyundai) यावर्षी Kia EV6 भारतात सादर केला आहे. जो एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकतो. आता कंपनी भारतात Hyundai Ionic 5 सादर करू शकते. ही भारतातच असेंबल केली जाईल. सेमी-कंडेन्स्ड डाउनच्या माध्यमातून ते भारतात सादर केले जाईल. त्यामुळे या कारची अधिक उत्सुकता आहे. ही करा कशी असणार, याकडे देखील ग्राहक लक्ष देऊन आहे.

कशी कार असणार?

ह्युंदाईच्या या कारबद्दल अधिकृतपणे फारशी माहिती नाही. पण लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की ही एसयूव्ही बॉडी टाईप कार असेल. या कारसह, वापरकर्त्यांना केवळ एक चांगला रस्ता दृश्यच नाही तर एक उत्कृष्ट वेगवान चार्जिंग अनुभव देखील मिळेल. आता या नव्या कारमध्ये काय नवीन गोष्टी असणार, कोणते फीचर्स असणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे.

महिंद्रा XUV 400

Hyundai ची ही आगामी इलेक्ट्रिक कार महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक कार Mahindra XUV 400 शी स्पर्धा करेल. महिंद्रानं आधीच सांगितलं आहे की ते लवकरच काही नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत, ज्याबद्दल कंपनी मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या नियोजनासह काम करत आहे. कंपनीने अद्याप आगामी Mahindra XUV 400 बद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही. तसेच त्याच्या ड्रायव्हिंग रेंजची माहितीही उपलब्ध नाही.

हे सुद्धा वाचा

ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटांची राजवट

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये, इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटाकडे सर्वाधिक कार पर्याय आहेत. एवढेच नाही तर टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात आहे. याशिवाय टाटा मोटर्सची ईव्ही विक्री सर्वाधिक आहे. आता Hyundaiच्या नव्या इलेक्ट्रीक कारमध्ये अधिक काय असणार, कोणते नवनवीन फीचर्स असणार, याविषयी देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बाजारात Hyundaiच्या व्या कारची वाट पाहिली जात आहे. अलीकडेच इलेक्ट्रिक कारची मागणी देखील वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकचं मार्केट देखील वाढतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.