Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात?
भारतीय सेना सर्वात जास्त Royal Enfield बाईक्सचा वापर करतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या बाईकचा वापर केला जातो आणि यावरच सर्व स्टंट परफॉर्म केले जातात.
नवी दिल्ली : आज संपूर्ण देश देशभक्तीने ओतप्रोत झालेला आहे. आज भारताचा 72वा प्रजासत्ताक दिवस आहे (Why Army Jawans Use Royal Enfield). दरवर्षी या प्रसंगी दिल्लीच्या इंडिया गेटवर भारतीय सेनेचे जवान आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात. सेनेच्या वेगवेगळ्या तुकड्या अनेक प्रकारच्या कसरती यावेळी दाखवतात. यामध्ये बाईक स्टंट अत्यंत खास असतो. पण, तुम्हाला माहित आहे का, या बाईक स्टंटसाठी सेना कुठल्या बाईकचा वापर करतात (Why Army Jawans Use Royal Enfield)?
भारतीय सेना सर्वात जास्त Royal Enfield बाईक्सचा वापर करतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या बाईकचा वापर केला जातो आणि यावरच सर्व स्टंट परफॉर्म केले जातात.
दमदार इंजिन आणि सुपर लुक
रॉयल एनफील्ड बाईकचा वापर करण्याचा सर्वात मोठं कारण त्याचं इंजिन आहे. लो आरपीएमवर हाय टॉर्क प्रोड्युस करते. म्हणजेच दमदार इंजिन सेनेच्या जवानांचा भार उचलण्यासाठी ही बाईक पूर्णपणे सक्षम आहे. सर्वोत्तम पावरमुळे ही बाईक स्टंटसाठी सर्वोत्तम पर्याय मानली जाते. त्याशिवाय ही एक रॉयल लुक देते आणि या बाईकची लोड कॅरिंग कॅपेसिटीही जास्त आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफची एक महिला जवान रॉयल एनफील्ड बाईकवर स्टंट करताना दिसली (Why Army Jawans Use Royal Enfield).
Royal Enfield क्लासिक 350 मध्ये 346cc चं सिंगल-सिलेंडर एअर-कुल्ड UCE थम्पर इंजिन मिळतं. 19.3PS चा मॅक्सिमम पावर आणि 28Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यात ही बाईक सक्षम आहे. या इंजिनला 5-स्पीड गियरबॉक्स जोडण्यात आला आहे.
डिजाईनही मजबूत
रॉयल एनफील्ड आपल्या दमदार डिजाईनमुळे ओळखलं जातं. या बाईकवर एकसोबत अनेक जण स्वार झाल्यावरही ही मजबुत राहते. बॅलेन्सच्या बाबतीत ही सर्वोत्तम बाईक आहे आणि हेवी वेट असल्याने याला चालवणे जास्त सोपं होतं. याला सर्वात बॅलेन्स्ड बाईक म्हटलं जातं आणि त्यामुळे परेडसाठी रायडर याला सहज सांभाळू शकतात. त्याशिवाय, Royal Enfield बाईकवर अटॅचमेंट्स लावणे सोपं असते.
टाटा नेक्सॉनहूनही महाग असलेली ‘ही’ सुपरबाईक भारतात लाँच, 28 जानेवारीपासून डिलीव्हरी सुरु होणार#Superbike https://t.co/HyFxTDkyyb
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2021
Why Army Jawans Use Royal Enfield
संबंधित बातम्या :
8 वर्ष जुन्या वाहनांच्या मालकांना नितीन गडकरींचा मोठा धक्का; नियमाचे फायदे आणि तोटे काय?
मोठी बातमी : तुमचं वाहन 8 वर्षांपेक्षा जुनं आहे? मग भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’