नवीन कार किंवा बाईक खरेदी करताना दोन चाव्या का देतात? अनेकांना नाही माहिती यामागचे खरे कारण

वाहनांची जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा कंपन्या ग्राहकाला दोन चाव्या (Keys For Car) देतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, असं का होतं, कंपनी दोन चाव्या का देते

नवीन कार किंवा बाईक खरेदी करताना दोन चाव्या का देतात? अनेकांना नाही माहिती यामागचे खरे कारण
कारची चावीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 2:16 PM

मुंबई : कार, बाईक, स्कूटर यांसारख्या वाहनांची जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा कंपन्या ग्राहकाला दोन चाव्या (Keys For Car) देतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, असं का होतं, कंपनी दोन चाव्या का देते ? याचे सर्वात मोठे कारण चावी हरवण्याशी संबंधित आहे आणि त्यानंतर दुसरे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कार, बाईक आणि स्कूटर इत्यादींसोबत दोन चाव्या दिल्या आहेत जेणेकरून एक चावी नेहमी तुमच्याकडे असते आणि दुसरी चावी तुम्ही तुमच्या घरी सुरक्षितपणे ठेवू शकता. हे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमची एक चावी गमावल्यास किंवा ती चोरीला गेल्यास, तुमच्याकडे वाहन वापरण्यासाठी दुसरी चावी असेल.

फायनान्य कंपनीसाठी

कंपन्यांनी दोन चाव्या देण्यामागे ग्राहकांना होणारा आर्थिक फायदा हे देखील एक कारण आहे. ग्राहकाची एक चावी हरवली तर दुसऱ्या चावीसाठी त्याला पैसे खर्च करावे लागतात, मात्र कंपन्यांनी दिलेल्या दुसऱ्या चावीमुळे ग्राहकांचा हा खर्च वाचतो. दुसरी चावीही हरवली तर ग्राहकाला पैसे खर्च करावे लागतात. वाहनाच्या चाव्या चोरीला गेल्यास विमा दाव्यातही वापरल्या जातात. दाव्यासाठी दोन्ही चाव्या विमा कंपनीला द्याव्या लागतात. जर तुमच्याकडे दोन्ही चाव्या नसतील तर अनेक वेळा कंपन्या दावा नाकारतात. याशीवाय अनेक फायनान्स कंपन्या गाडीची दुसरी चावी स्वःताजवळ ठेवते. जेणेकरून कर्जाची थकबाकी पुर्ण न झाल्यास गाडी जप्त करण्यासाठी कंपनी त्या चावीचा वापर करू शकते.

हे सुद्धा वाचा

सध्या अनेक कारमध्ये रिमोट पद्धतीच्या चाव्या देण्यात येत आहे. अशा कारमध्ये एक रिमोट आणि एक मॅनुअल अशा दोन्ही प्रकारच्या चाव्या देण्यात येते. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास कारची दुसरी जावी वापरून कार सुरू करता यावी हा यामागचा उद्देश असतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.