भारतात सेंकड हँड गाड्यांच्या मागणीत विक्रमी वाढ, नक्की कारण काय?
इंडियन ब्लू बुकने केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार, आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील सेकंड हँड कार मार्केट 4.2 मिलियन युनिट इतकं मोठं होतं.
मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतात सेकंड हँड कार (Second Hand Car) विक्रीत मोठी वाढ झाली आहे. स्टेटिस्टाच्या एका अहवालात म्हटल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील कार बाजाराचे आकारमान 4.4 मिलियन (दशलक्ष – 10 लाख) युनिटपेक्षा जास्त होते, जे त्या काळात नवीन कार मार्केटच्या आकारापेक्षा जास्त होते. भारतातील सेकंड-हँड कार विक्रीची 2019 मधील याच महिन्याची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये भारतातील सेकंड-हँड कार विक्रीत जवळपास 50% वाढ झाली आहे. (Why there is huge demand of second hand cars in india, here is the reason)
इंडियन ब्लू बुकने केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार, आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील सेकंड हँड कार मार्केट 4.2 मिलियन युनिट इतकं मोठं होतं. त्याच वेळी असा दावा केला गेला आहे की, त्याच आर्थिक वर्षात कार विक्रीत 5% YoY वाढ झाली आहे, तर कोरोना महामारीच्या आर्थिक संकटामुळे नवीन कार विक्रीत 17.8% घट झाली आहे. नवीन कारच्या 2.8 दशलक्ष युनिट्सच्या विक्रीपेक्षा सेकंड-हँड कारची विक्री 50% जास्त आहे.
लॉकडाऊनमुळे विक्रीत घट
आर्थिक वर्ष 2021 मध्ये, नवीन आणि सेकंड-हँड कार विक्रीच्या बाबतीत व्यवसायाची गती मंदावली आहे. गेल्या आर्थिक वर्षात सेकंड-हँड कारच्या 3.9 मिलियन युनिट्सची विक्री झाली होती. तथापि, वापरलेल्या कारच्या विक्रीत पुन्हा वाढ दिसून आली आहे, काही महिन्यांपूर्वी देशातील लॉकडाऊन हटवण्यात आलं होतं. त्यामुळे कार घेण्याचा विचार करीत असलेल्या सर्व ग्राहकांनी कार खरेदी केली होती. अशा परिस्थितीत, येत्या काही वर्षांत यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
ग्राहकांचा सेकेंड हँड गाड्यांवर वाढता विश्वास
कोरोना साथीच्या आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूकही या क्षणी बंद आहे, तर काही लोकांना या अशा परिस्थिती स्वत: च्या गाडीने प्रवास करावासा वाटतो. त्यामुळेच सेकंड हँड गाड्यांची मागणी वाढू लागली आहे. जे लोक सध्या स्थायी नोकर्या करत नाहीत किंवा खासगी नोकरी करतात अशा ग्राहकांमध्ये ही मागणी बर्यापैकी वाढू लागली आहे.
ग्लोबल चिप शॉर्टेजमुळे सेकेंड हँड गाड्यांना वाढती मागणी
एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी वाहन उद्योगाचं खूप मोठं नुकसान झालं होतं. त्यातून सावरत वाहन उद्योग पुन्हा रुळावर आला आहे, असं वाटू लागलेलं असताना सेमीकंडक्टर चिप टंचाई निर्माण झाल्याने पुन्हा एकदा वाहन उद्योगाला मोठा फटका बसत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु आता ग्राहकांनी जुन्या वाहनांची खरेदी करण्यास सुरवात केली आहे.
इतर बातम्या
ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?
Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय
(Why there is huge demand of second hand cars in india, here is the reason)