Bajaj ने केली कमाल, Pulsar आता पेट्रोलवर नाही तर या इंधनावर धावणार

Bajaj Pulsar Flex Fuel | बजाज ऑटोने Pulsar NS160 फ्लेक्स फ्युअल व्हर्जन सादर केले आहे. याशिवाय Dominar 400 फ्लॅक्स, फ्युएल मॉडेल पण समोर आले आहे. भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये अनेक कंपन्यांनी नवीन वाहनं आणि तंत्रज्ञान यांची खास झलक दाखवली आहे.

Bajaj ने केली कमाल, Pulsar आता पेट्रोलवर नाही तर या इंधनावर धावणार
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 9:55 AM

नवी दिल्ली | 4 February 2024 : भारताची दिग्गज मोटरसायकल कंपनी बजाज ऑटो नवीन बाईक बाजारात आणणार आहे. ही बाईक पेट्रोलवर नाही तर दुसऱ्या इंधनावर धावणार आहे. यापूर्वी सीएनजी, एलपीजी बाईकवर कंपनी काम करत आहे. या बाईक लवकरच बाजारात येतील. दिल्लीत सध्या भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो 2024 सुरु आहे. यामध्ये नवीन बजाज पल्सर सादर झाली तर बजाज डोमिनार हे नवीन मॉडेल पण दिसले. या दोन्ही बाईक पेट्रोल ऐवजी फ्लेक्स फ्युएलवर धावतील.

बाईकच्या इंजिनमध्ये बदल

बजाज कंपनीने दोन्ही बाईकच्या इंजिनमध्ये बदल केला आहे. या दोन्ही बाईक फ्लेक्स फ्युएलवर धावतील. या नवीन मोटरसायकल इथेनॉल-ब्लेंड पेट्रोलवर धावतील. नवीन पल्सरच्या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल काम करेल, याची माहिती समोर आलेली नाही. बजाजने पल्सरच नाही तर डोमिनार हे मॉडेल पण मॉडिफाय केले आहे.

हे सुद्धा वाचा

फ्लेक्स फ्युएल व्हर्जन

बजाजने Pulsar NS160 आणि Dominar 400 ला फ्लॅक्स फ्युएल आधारीत बाईक आणली आहे. Dominar 400 27.5 टक्के इथेनॉल-पेट्रोल ब्लेंड फ्यूएलवर धावेल. सध्या ब्राझीलसह 35 हून अधिक देशात Dominar E27.5 पूर्वीपासून रस्त्यावर धावत आहे.

किंमत तरी किती?

बजाज पल्सर आणि डोमिनारच्या फ्लेक्स फ्युएल व्हर्जनच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आलेला नाही. ही दिसायला सध्याच्या मॉडेलप्रमाणेच आहे. भारतात Pulsar NS160 ची एक्स शोरुम किंमत 1.37 लाख रुपये आहे. तर Dominar 400 या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.30 लाख रुपये आहे.

सीएनजी बाईकचा पर्याय का

सीएनजी बाईकची ही झलक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही CNG Bike बाजारात दाखल व्हायला एक वर्ष तरी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बाईकबाबत अजून पण भारतीय साशंक आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि ई-बाईक यामधील सीएनजी हा पर्याय भारतीयांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही बाईक बाजारात हंगामा करेल असा दावा करण्यात येत आहे.

बजाज घेणार आघाडी

कंपनी इलेक्ट्रिक बाईक, सीएनजी बाईकच नाही तर कंपनी एलपीजी, इथेनॉलवर पण बाईक आणण्याच्या तयारीत आहे. सीएनजी बाईक उत्पादनाचे लक्ष्य पण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनी जवळपास 1 ते 1.20 लाख वाहनांचे दरवर्षी उत्पादन करण्यावर भर देत आहे. भविष्यात ही क्षमता 2 लाख युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.