Xiaomi EV SU7 : कमी किंमतीत जोरदार फीचर्ससह जगभरात लोकप्रिय असलेल्या चायनिज मोबाईल कंपनीने बाजारात धुराळा उडवून दिला. शिओमी ही कंपनी भारतीय बाजारात सुद्धा आहे. कंपनीने इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे. कंपनीच्या या कारवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. अवघ्या एका दिवसांत कंपनीकडे ऑर्डरचा पाऊस पडला. 24 तासांच्या आतच जवळपास 90,000 कारच्या ऑर्डरची बुकिंग झाली. या घडामोडींमुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. शिओमी ही चीनमधील 5वी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. स्मार्टफोन बाजारात दबदबा तयार केल्यानंतर कंपनी आता ऑटोमोबाईल कंपनीत उतरली आहे.
एका चार्जिंगमध्ये सूसाट
Xiaomi च्या SUV मध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये सर्वात मोठे फीचर हे आहे की कार एकदा चार्ज केल्यावर 800 किलोमीटरपर्यंत धावते. इतकेच नाही तर 0-100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला केवळ 2.78 सेकंदाचा वेळ लागतो. या कारविषयी जाणून घेऊयात इतर फीचर…
24 तासांत 90,000 कारची ऑर्डर
शिओमीने ही ईव्ही बाजारात दाखल करुन इलेक्ट्रिक कार बाजारात अनेक दिग्गज कंपन्यांना आव्हान दिले आहे. या कारवर ग्राहकांनी ताबडतोब भरवसा पण दाखविला. 24 तासांच्या आतच या कंपनीला 90,000 कारची ऑर्डर मिळाली. शिओमीने या इलेक्ट्रिक कारच्या मायलेजविषयी केलेल्या दाव्यामुळे ग्राहकांच्या या कारवर उड्या पडल्या आहेत.
#XiaomiSU7 pic.twitter.com/tfLtLIhphC
— Jason (@Jas0nYu) March 31, 2024
कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी
हाँगकाँग बाजारात शिओमी कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. या शेअरचा सध्याचा भाव 16.74 HKD इतका आहे. आज या शेअरमध्ये 9.91 टक्क्यांची उसळी दिसून आली. एका महिन्यात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे.