3 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग; Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल, किंमत तरी किती?

Xiaomi Electric Car Xiaomi SU7 : शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली. मंगळवारी बंगळुरु येथे झालेल्या एका इव्हेंटमध्ये ही कार सादर करण्यात आली. ही कार अवघ्या 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते.

3 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग; Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल, किंमत तरी किती?
शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 4:02 PM

Xiaomi ने मंगळवारी भारतात त्यांची बहुचर्चित इलेक्ट्रिक कार दाखल केली. या इलेक्ट्रिक कारचे नाव Xiaomi SU7 असे आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. ही कार केवळ 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. या कारच्या लाँचिंगवेळी अवघ्या एका दिवसांत कंपनीकडे ऑर्डरचा पाऊस पडला होता. 24 तासांच्या आतच जवळपास 90,000 कारच्या ऑर्डरची बुकिंग झाली होती.

शिओमी ही चीनमधील 5वी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. स्मार्टफोन बाजारात दबदबा आहे. कंपनीने भारतात स्मार्टफोन Redmi 13 5G लाँच केला आहे. याशिवाय कंपनीने TWS आणि पॉवर बँक पण लाँच केली आहे. कंपनी आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पण उतरली आहे.

फीचर्स पण दमदार

हे सुद्धा वाचा

शाओमीच्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये सर्वात मोठे फीचर हे आहे की कार एकदा चार्ज केल्यावर 800 किलोमीटरपर्यंत धावते. इतकेच नाही तर 0-100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला केवळ 2.78 सेकंदाचा वेळ लागतो. कारची Power 673 PS इतकी आहे. तर या कारचा टॉर्क 838 Nm इतका आहे. Xiaomi SUV 7 एक फोर डोअर EV सेडान कार आहे. कारची लांबी 4997 mm, रुंदी 1963 mm आणि इंची 1455 mm इतकी आहे. या कारमध्ये सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 73.6 kwh ची बॅटरी तर टॉप व्हेरिएंटमध्ये 101kWh बॅटरी आहे.

शाओमीच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये इंडिविज्युअल ड्राईव्ह मोड आहे. शाओमी स्मार्ट चेसिसवर तयार करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने यामध्ये एकदम खास ब्रेकिंग सिस्टिम तयार केली आहे. या कारमध्ये 838NMचा किमान टॉर्क मिळतो. तर यामध्ये 673PS ची कमाल शक्ती मिळते.

या कारची किंमत किती?

चीनमध्ये या कारची किंमत 2,15,900 ते 2,99,900 युआन म्हणजे भारतीय चलनात 25,04,656 ते 33,39,600 रुपयांच्या दरम्यान आहे. या कारची लांबी 4997 मिमी, रुंदी 1,963 मिमी, उंची 1455 मिमी तर व्हीलबेस 3000 मिमी आहे. यामध्ये विविध व्हील साईजचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार कारची किंमत कमी जास्त होऊ शकते. कंपनीने भारतात ही कार सादर केली आहे. पण ही कार भारतात विक्री करणार का याविषयीची खलबतं सुरु आहे. काहींच्या मते ही कार भारतात लाँच होणार नाही तर काहींना वाटते ही कार भारतात लाँच होईल.

Non Stop LIVE Update
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.