कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

यामाहा मोटर इंडिया लिमिटेड कंपनीने (Yamaha Moto India) आज देशांतर्गत मार्केटमध्ये 2021 FZ FI आणि FZS FI ची घोषणा केली आहे.

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:11 PM

मुंबई : यामाहा मोटर इंडिया लिमिटेड कंपनीने (Yamaha Moto India) आज देशांतर्गत मार्केटमध्ये 2021 FZ FI आणि FZS FI ची घोषणा केली आहे. अपडेटेड यामाहा FZ FI ची सुरुवातीची किंमत 1.03 लाख रुपये इतकी आहे, तर FZS FI ची किंमत 1.07 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरु होते. दोन्ही गाड्यांच्या किंमतीत जवळपास 1000 आणि 2500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. MY अपडेटचा भाग म्हणून जपानी मोटारसायकल निर्मात्या कंपनीने ही बाईक नवीन रंगांसह सादर केली आहे. (Yamaha FZ Series updated, now lighter, flashier and with connected tech)

2021 यामाहा FZ F1 रेसिंग ब्लू आणि मेटॅलिक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तर FZS FI नव्या मॅट रेड कलर, डार्क मॅट ब्लू, मॅट ब्लॅक, डार्क नाईट आणि विंटेज एडिशनमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमधील खास फीचर म्हणजे यामध्ये कंपनीने नवीन ब्लुटूथ कनेक्टिविटी फीचर दिलं आहे.

फीचर्स

स्मार्टफोन अॅप्लिकेशनद्वारे कनेक्ट करुन तुम्ही रायडिंगदरम्यान कॉल्स रिसिव्ह करु शकता. हजार्ड, ई-लॉकदरम्यान या फीचरचा वापर करु शकता. या बाईकचं वजन 137 किलो होतं आता ते दोन किलोने घटवलं असून या बाईकचं वजन 135 इतकं झालं आहे. नवीन FZ (149CC) श्रृंखलेतील सर्व मॉडल सिंगल चॅनल ABS द्वारे चालतात. यामध्ये LED हेडलाइट, 140 मिमी रुंद रियर रेडियल टायर, सिंगल-पीस सीटिंग आणि BS 6 मध्ये टिकाऊ 149 cc FI इंजन देण्यात आलं आहे.

या गाडीतील इतर फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये साइड स्टँड इंजिन कटऑफ स्विच देण्यात आला आहे. तर एग्जॉस्ट सिस्टिम अधिक जबरदस्त साऊंडसाठी ट्यून करण्यात आली आहे. यामाहा FZ FI (Yamaha 2021 FZ FI) रेंजची फ्युल टँक क्षमता 13 लीटर इतकी आहे. नवीन अपग्रेडमध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त फीचर्स मिळतील. या बाईकची मार्केटमध्ये Honda XBlade, Bajaj Pulsar NS160, TVS Apache RTR 160 4V आणि इतर मोटारसायकलसोबत स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा

भारतात ‘या’ गाड्या 3 लाख रुपयांपेक्षा स्वस्त; देशात सर्वाधिक पसंती

बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

Safety Features नसतील तर कार उत्पादन बंद करा; ऑटो कंपन्यांबाबत सरकारची कठोर भूमिका

(Yamaha FZ Series updated, now lighter, flashier and with connected tech)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.