Yamaha RX100 Comeback : ती पुन्हा येणार… Yamahaची जुन्या काळातील फेमस बाईक लवकरच येतेय, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या…
Yamaha RX100 : जुन्या मॉडेलप्रमाणेच नवीन मॉडेल्समध्येही त्याच प्रकारचं सीट्स आहे. ते अलॉय व्हीलसह नॉक करेल. ही बाईक परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये येणार आहे. कंपनी एक ई-स्कूटरही तयार करत आहे.
मुंबई : यामाहा (Yamaha RX100) कमबॅक असं म्हटलं तर अनेकांना आनंद झाला असेल ना. ती जुनी लोकप्रिय बाईक (Bike), काय तो जमाना, काय त्या बाईकवर फिरण्याची मजा, हे सगळं आता पुन्हा अनुभवता येणार आहे. आता यामाहा आपल्या जुन्या लोकप्रिय बाईक्सपैकी एक लाँच करणार आहे. ही बाईक 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक होती आणि आता कंपनीनं या बाईकच्या परतण्याची घोषणा केली आहे. Yamaha RX 100 कंपनीनं 1985 मध्ये लाँच केले होते आणि 1996 मध्ये त्याचे उत्पादन थांबवले होते. आता कंपनी पुन्हा एकदा ही मोटरसायकल लाँच करणार आहे. लाँच करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला या बाईकविषयी सांगणार आहोत. शेवटी बाईक घ्यायची असल्यास त्याविषयी संपूर्ण माहिती असायला हवी ना, त्याची किंमत (Rate) काय, त्यामध्ये काही नवीन वैशिष्ट्य आहे का, हेच सर्व जाणून घ्या…
कधी लाँच होणार?
जुन्या मॉडेलप्रमाणेच नवीन मॉडेल्समध्येही अशाच प्रकारच्या सीट्स पाहायला मिळतील. पण, यावेळी ते अलॉय व्हीलसह येतील. ही बाईक परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये येणार आहे. कंपनी 2025 आणि 2026 या वर्षात काही नवीन उत्पादनं लाँच करू शकते. दुसरीकडं Yamaha RX 100 फक्त 2026 मध्येच सादर केली जाऊ शकते. कंपनीनं लॉन्चिंग टाइमलाइनबद्दल माहिती शेअर केलेली नाही.
यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर
Yamaha एक इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे जी भारतात आधीच अस्तित्वात असलेल्या Ola S1 Pro Simple One आणि Okinawa स्कूटरशी टक्कर देईल. आम्ही तुम्हाला सांगूया की टू-व्हीलर इलेक्ट्रिक सेगमेंटचा भारतीय बाजारपेठेत गेल्या एक-दोन वर्षांत झपाट्यानं विस्तार झाला आहे. यामाहाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर इतर स्कूटरच्या तुलनेत खूपच वेगळी असेल. भारतीय बाजारपेठेत, कंपनी जागतिक बाजारपेठेत सध्या असलेल्या स्कूटर आयात करू शकते.
Yamaha RX100 मध्ये कंपनीने 98.2 cc चे एअर-कूल्ड, रीड वाल्व्ह टू-स्ट्रोक इंजिन वापरले आहे. हे जे 11.2hp पॉवर आणि 10.45Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा टॉप स्पीड 110 किलोमीटर प्रति तास होता आणि हे इंजिन 4-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सनं सुसज्ज होते. यात KYB टेलिस्कोपिक फोर्क्स, स्विंग आर्म्स आणि दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक्स आहेत. मायलेजच्या बाबतीत ही बाईक आजच्या काळातील प्रवासी मोटारसायकलींपेक्षा खूप मागे असली तरी सर्वसाधारणपणे ही बाईक 40 ते 45 kmpl चा मायलेज देते. आता त्याच्या नव्या लूककडून खूप अपेक्षा आहेत.