Self Balancing Scooter : सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटरची कमाल! ट्रॅफिक जाम असो वा बसू द्या धक्का, या स्कूटरवरुन तुम्ही बिलकूल नाही पडणार

Self Balancing Scooter : सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर आल्याने आता तुम्हाला मोठा फायदा होईल, काय आहे स्कूटरची वैशिष्ट्ये

Self Balancing Scooter : सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटरची कमाल! ट्रॅफिक जाम असो वा बसू द्या धक्का, या स्कूटरवरुन तुम्ही बिलकूल नाही पडणार
तोल आपोआप सांभाळणार
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 6:50 PM

नवी दिल्ली : ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये मारुतीपासून ते एमजी पर्यंत अनेक वाहन कंपन्या त्यांची आगळीवेगळी उत्पादने घेऊन आली आहेत. त्यातच एका स्कूटरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मुंबई येथील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप लाईगर मोबिलिटीने (Liger Mobility) भारताची पहिली सेल्फ बॅलेन्सिग इलेक्ट्रिक स्कूटर (Self Balancing Electric Scooter) या ऑटो एक्सपोत सादर केली. ही स्कूटर स्वतः बॅलन्स करते. त्यामुळे तुम्हाला पाय टेकवण्याची गरज पडत नाही.

म्हणजे दुचाकी वाहन चालवताना ज्यांना तोल जाण्याची सतत भीती वाटते, त्यांना ही स्कूटर फायद्याची आहे. त्यातच ही इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने पेट्रोलवरील वाढत्या खर्चाचीही चिंता करण्याची गरज नाही. कंपनीने ही स्कूटर दोन मॉडेलमध्ये उपलब्ध केली आहे. Liger X आणि Liger X+ असे दोन मॉडेल आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरचे वैशिष्ट्ये म्हणजे तोल सांभाळणारी ही भारतातीलच नाही तर जगातील पहिली स्कूटर आहे. या स्कूटर्समध्ये ऑटो बॅलेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. वेग कमी असला तरी ही स्कूटर तुम्हाला पडू देत नाही.

हे सुद्धा वाचा

कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करते. स्कूटर सेंसरच्यामार्फत डाटा जमा करते. त्याआधारे ही स्कूटर तोल सांभाळते. या स्कूटरमुळे तुम्हाला वाहनांच्या गर्दीत पाय टेकवण्याची गरज पडत नाही. ही स्कूटर तोल सावरते.

कोणत्याही दुचाकीला (Two-Wheeler) तोल सांभाळण्यासाठी एका बाजुला स्टँड देण्यात येते. पण व्यक्ती वाहन चालविताना तोल सांभाळत नसेल तर तो पडतो. कमी वेग असेल तर अडचण अधिक येते. अशावेळी ही स्कूटर तुमच्या मदतीला येते.  तोल ढळत नाही.

हीच समस्या हेरुन कंपनीने हे फिचर आणले आहे. हे फिचर 5 ते 7 किलोमीटर प्रति तास कमा करताना उपयोगी पडणार आहे. हे फिचर डीएक्टिवेट करण्याचा पर्याय पण देण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये लिथियम आर्यन बॅटरी आहे. Liger X स्कूटर 65kmph अतिवेग देते. तर Liger X+ में 100 किमीची रेंज देते. Liger X ची बॅटरी 3 तासांच्या आत फुल चार्ज होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.