Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Live | राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल: पंतप्रधान मोदी

मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजन सोहळा सुफल संपन्न झाला. राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल, असं मोदी म्हणाले Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan

Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Live | राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल: पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Aug 05, 2020 | 2:22 PM

लखनौ : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा  संपन्न झाला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजन सोहळा सुफल संपन्न झाला. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश होता. Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. मग प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज  यांनी प्रभू राम आणि उभारत असलेल्या मंदिराबाबत आपलं संबोधन केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामाच्या जयघोषात भाषणाला सुरुवात केली.

Live Update

पंतप्रधान मोदींचं भाषण

राम जन्मभूमी ट्रस्टने मला येथे आमंत्रित करुन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारत एक सुवर्ण इतिहास रचत आहे. आज पूर्ण भारत राममय आहे. पूर्ण देश रोमांचित झाला आहे. प्रत्येक मनात दीपमय झालंय. आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपत आहे. कोट्यावधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला.

अनेक शतके टेंटखाली राहिलेल्या रामलल्ला यांच्यासाठी एक भव्य मंदिर उभं राहत आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं नाही असं एकही ठिकाण नव्हतं. 15 ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानांचं प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतकं, अनेक पीढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचंच प्रतिक आहे.

राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पण आणि तर्पण पण होता, संघर्षही होता आणि संकल्पही होता. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी भारतीयांच्यावतीने नमन करतो. यात सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती हा सोहळा पाहत आहे. राम आपल्या मनात एकरुप झाले आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणेसाठी आपण भगवान रामाकडेच पाहतो.

इमारती नष्ट झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आपल्या मनात आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत.

हनुमानजींच्या आशिर्वादाने राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली आहे. हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनले. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तयार होतील. पूर्ण जगातील लोक प्रभू राम आणि माता जानकीचं दर्शन करायला येतील.

कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाचा हा कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तिच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.

ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी गांधींना सहयोग दिला, तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भुतो न भविष्यती आहे.

भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानयुगे प्रेरणा देत राहिल. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत.

तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्वठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पुजनीय आहेत.

इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंग किंवा राम कथांचं वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितलं जातं. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.

श्रीरामांच्या नावाप्रमाणेच हे मंदिर अनंत काळापर्यंत संपूर्ण मानवतेला प्रेरणा देईल. त्यामुळे भगवान रामांचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहचेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ही आपली विशेष जबाबदारी आहे. त्यासाठीच आज श्रीरामांचं जिथं जिथं पाऊल पडलं तिथं राम सर्किट तयार केलं जात आहे.

शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे.

आपली मातृभूमी स्वर्गाहून अधिक महत्त्वाची असते हाच श्रीरामांचा संदेश आहे. आपला देश जितका शक्तिशाली होईल, तितकी शांती तयार होईल. रामाची हीच नीती आपलं मार्गदर्शन करत राहिलं. गांधींचं रामराज्य देखील यातूनच येईल. राम आपल्या काळानुसार चालण्यास शिकवतात. राम आधुनिकतेचं प्रतिक आहे. त्यांच्या याच विचाराने भारत आज पुढे जात आहे.

आपल्याला आपआपसातील बंधुता जपत श्रीरामांचं हे कार्य सिद्धीस न्यायचं आहे. आपल्याला सर्वांच्या भावनांचा आदर करायचा आहे. सर्वांचा विकास करायचा आहे. आपल्या परिश्रमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायची आहे.

भगवान रामांचं हे मंदिर युगानुयुगे मानवतेला प्रेरणा देईल, मार्गदर्शन करेल. कोरोनामुळे जी स्थिती तयार झाली, त्यात रामांच्या मर्यादांची अधिक गरज आहे. आता ‘दो गज की दुरी, मास्क हे जरुरी’ ही मर्यादा आवश्यक.

[svt-event title=”राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल – पंतप्रधान मोदी” date=”05/08/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आज देशाचा कानाकोपरा श्रीराममय झाला आहे – मोदी” date=”05/08/2020,1:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निमंत्रित केल्याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे आभार, हे माझे सौभाग्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी ” date=”05/08/2020,1:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सरसंघचालक मोहन भागवत लाईव्ह” date=”05/08/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राम मंदिर भूमिपूजनाचा संपूर्ण सोहळा” date=”05/08/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”राम मंदिर भूमिपूजन सोहळा ” date=”05/08/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींचा रामलल्लाला साष्टांग दंडवत” date=”05/08/2020,12:43PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”अयोध्या राम मंदिर भूमिपूजन विधींना सुरुवात” date=”05/08/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा” date=”05/08/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नरेंद्र मोदींचा रामलल्लाला साष्टांग दंडवत ” date=”05/08/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान गढीवरुन प्रस्थान” date=”05/08/2020,11:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानासमोर नतमस्तक ” date=”05/08/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान गढीवर आगमन” date=”05/08/2020,11:47AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान गढी येथे पोहचले. उपस्थितांना अभिवादन करत गढीकडे रवाना. मास्क घालून शारीरिक अंतराचे नियम पाळत कार्यक्रम सुरु. [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येत आगमन” date=”05/08/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल” date=”05/08/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल ” date=”05/08/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढी उभारली” date=”05/08/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल” date=”05/08/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”खासदार गोपाळ शेट्टी यांनी जय श्रीराम लिहिलेला 15 फुटाचा फुगा आकाशात सोडला” date=”05/08/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”देशभरात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्साह” date=”05/08/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी अयोध्येला रवाना” date=”05/08/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

9.35 am – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना

9.30 am – पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर भूमिपूजनासाठी दिल्लीतील निवासस्थानाहून अयोध्येला रवाना

हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. (Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program Live Update) पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीतून अयोध्येकडे रवाना झाले. ते तासाभरात म्हणजे साडेदहाच्या सुमारास लखनौमध्ये दाखल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साडे अकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं.

राम मंदिर भूमिपूजनाचा जल्लोष 

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासूनच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढली आहे. अयोध्येत घर आणि मंदिरांना रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केल्याने अक्षरशः दिवाळीचे स्वरुप आले आहे.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. एनएसजी कमांडोंसह चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अद्ययावत गाड्या आणि सुरक्षा ताफ्याची अयोध्येच्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली. साकेत महविद्यालयाच्या मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान असेल. मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम पत्रिका

सकाळी 9.35 वा. – दिल्लीतून प्रस्थान सकाळी 10.35 वा. – लखनौ विमानतळावर आगमन सकाळी 10.40 वा. – हेलिकॉप्टरने अयोध्येकडे प्रस्थान सकाळी 11.30 वा. – अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर आगमन सकाळी 11.40 वा. – हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा दुपारी 12.00 वा. – राम जन्मभूमी परिसरात आगमन दुपारी 12.15 वा. – राम जन्मभूमी परिसरात वृक्षारोपण दुपारी 12.30 वा. – श्रीराम मंदिर भूमिपूजन दुपारी 12.40 वा. – श्रीराम मंदिर पायाभरणी दुपारी 02.05 वा. – साकेत कॉलेज हेलिपॅडकडे प्रस्थान दुपारी 02.20 वा. – हेलिकॉप्टरने लखनौकडे प्रस्थान, लखनौहून दिल्लीसाठी प्रस्थान

पवित्र माती आणि जल अयोध्येत

भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांचे 135 संत उपस्थिती लावणार आहेत. जवळपास 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले आहे. हनुमान गढीवर पताका चिन्हाचे पूजन करण्यात आले आहे.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस संपत राय यांच्या माहितीनुसार कोविड19 च्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेची दखल घेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कठोर असेल. भूमिपूजनासाठी 175 जणांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व आमंत्रित व्यक्तींनी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भूमिपूजन प्रांगणात येणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

एक लाख 11 हजार लाडू तयार

राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या नियोजित ठिकाणी पूजा होईल. अयोध्येत प्रसादासाठी 1 लाख 11 हजार लाडू तयार केले जात आहेत. राम मंदिराचा प्रसाद भारतीय दूतावास जगभर वाटणार आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत. श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल. नवीन डिझाईनमध्ये तीन घुमट जोडले गेले आहेत. स्तंभांची संख्या 160 वरुन 366 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या जिन्याची रुंदी 6 फुटांवरुन 16 फूट करण्यात आली आहे. मंदिराची उंची 141 फुटांवरुन 161 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

राम मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरुच आहे. देणगी देण्याबाबत भक्तांकडून सातत्याने विचारणा होत आहे. चांदीच्या विटा देण्याऐवजी बँक खात्यात देणगी द्या, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भक्तांना केले आहे.

(Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program Live Update)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.