Narendra Modi Ayodhya Live | मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण : नरेंद्र मोदी

अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. (PM Narendra Modi Speech Ayodhya Ram Mandir Bhumipoojan Live)

Narendra Modi Ayodhya Live | मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण : नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 05, 2020 | 2:16 PM

लखनऊ : अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर “जय श्रीराम”चा नारा देऊन नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केली. “ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत आहे” अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. अनेक शतके तंबूखाली राहिलेल्या रामलल्ला यांच्यासाठी एक भव्य मंदिर उभं राहत आहे. आज पूर्ण भारत राममय झाला आहे, असेही मोदी म्हणाले. भगवान श्रीरामाच्या गुणाचा दाखला देत कोरोनाच्या काळात ‘मर्यादा’ पाळण्याचे आवाहन मोदींनी केले. (PM Narendra Modi Speech Ayodhya Ram Mandir Bhumipoojan Live)

PM  Narendra Modi Live

– भगवान रामांचं हे मंदिर युगानुयुगे मानवतेला प्रेरणा देईल, मार्गदर्शन करेल. कोरोनामुळे जी स्थिती तयार झाली, त्यात रामांच्या मर्यादांची अधिक गरज आहे. आता ‘दो गज की दुरी, मास्क हे जरुरी’ ही मर्यादा आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– आपल्याला आपआपसातील बंधुता जपत श्रीरामांचं हे कार्य सिद्धीस न्यायचं आहे. आपल्याला सर्वांच्या भावनांचा आदर करायचा आहे. सर्वांचा विकास करायचा आहे. आपल्या परिश्रमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायची आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– आपली मातृभूमी स्वर्गाहून अधिक महत्त्वाची असते हाच श्रीरामांचा संदेश आहे. आपला देश जितका शक्तिशाली होईल, तितकी शांती तयार होईल. रामाची हीच नीती आपलं मार्गदर्शन करत राहील. गांधींचं रामराज्य देखील यातूनच येईल. राम आपल्या काळानुसार चालण्यास शिकवतात. राम आधुनिकतेचं प्रतिक आहे. त्यांच्या याच विचाराने भारत आज पुढे जात आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– श्रीरामांच्या नावाप्रमाणेच हे मंदिर अनंत काळापर्यंत संपूर्ण मानवतेला प्रेरणा देईल. त्यामुळे भगवान रामांचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहचेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ही आपली विशेष जबाबदारी आहे. त्यासाठीच आज श्रीरामांचं जिथं जिथं पाऊल पडलं तिथं राम सर्किट तयार केलं जात आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंग किंवा राम कथांचं वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितलं जातं. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी महात्मा गांधींना सहयोग केला, तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-हनुमानजींच्या आशिर्वादाने राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली आहे. हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तयार होतील. पूर्ण जगातील लोक प्रभू राम आणि माता जानकीचं दर्शन करायला येतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पण आणि तर्पण पण होता, संघर्षही होता आणि संकल्पही होता. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने नमन करतो. यात सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती हा सोहळा पाहत आहे. राम आपल्या मनात एकरुप झाले आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणेसाठी आपण भगवान रामाकडेच पाहतो  : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-इमारती नष्ट झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आपल्या मनात आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-अनेक शतके टेंटखाली राहिलेल्या रामलल्ला यांच्यासाठी एक भव्य मंदिर उभं राहत आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं नाही असं एकही ठिकाण नव्हतं. 15 ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानांचं प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतकं, अनेक पिढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचंच प्रतिक आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-राम जन्मभूमी ट्रस्टने मला येथे आमंत्रित करुन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारत एक सुवर्ण इतिहास रचत आहे. आज पूर्ण भारत राममय आहे. पूर्ण देश रोमांचित झाला आहे. प्रत्येक मनात दीपमय झालंय. आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपत आहे. कोट्यवधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन

नरेंद्र मोदी सकाळी साडेअकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. आधी त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालत नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे विधी पार पडले.

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश होता. भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांच्या 135 साधू-संतांचे आशीर्वाद लाभले. (PM Narendra Modi Speech Ayodhya Ram Mandir Bhumipoojan Live)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टरने अयोध्येत आगमन झालं. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. तिथून विशेष वाहनाने ते हनुमान गढीला रवाना झाले.

हेही वाचा : राम जन्मभूमीत मोदींच्या हस्ते पारिजातकाचे वृक्षारोपण, प्राजक्ताच्या झाडाचे महत्त्व काय?

हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत दाखल झाले. अयोध्येला जणू दिवाळीचे स्वरुप आले आहे.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. एनएसजी कमांडोंसह चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (PM Narendra Modi Speech Ayodhya Ram Mandir Bhumipoojan Live)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.