LIVE : उद्धव ठाकरे अयोध्येतून मुंबईकडे रवाना
अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून […]
अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येईन. आता हिंदू गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं लक्ष्मण किला परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण किल्ल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा केली. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांनी सोबत आणलेल्या चांदीच्या वीटेने. तब्बल 4 किलोची चांदीची वीट उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर आणली आहे. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदीर फीर सरकार’ अशी घोषणा देत शिवसैनिक राम मंदिरासाठी अयोध्येत आले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतून अयोध्येच्या दिशेने निघाले. सुमारे दीड तासात ते फैजाबादमध्ये पोहोचले. त्यानंतर ते सहकुटुंब आधी पंचवटी हॉटेलमध्ये गेले. तिथून ते कार्यक्रमाला रवाना झाले.
LIVE UPDATE
– मुंबई : उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मुस्लिम समाजातील लोक मुंबई विमानतळावर
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतून मुंबईकडे रवाना, पंचवटीतील हॉटेलमधून फैजाबाद विमानतळाकडे उद्धव ठाकरे निघाले
– थोड्याच वेळात उद्धव ठाकरे अयोध्येहून मुंबईकडे रवाना होणार
– आदित्य ठाकरेंकडून अयोध्येत शिवसेना शाखेचे उद्घाटन, आता अयोध्येत शिवसेनेची शाखा, आदित्यने लक्ष्मण किल्ला परिसरात रचली शिवसेना शाखेची वीट
– कोर्टाच्या हातात असेल तर मंदिराच आश्वासन कशाला- उद्धव ठाकरे
– निवडणुकिसाठी आधी रामनाम नंतर आराम – उद्धव ठाकरे
– चार वर्षात भाजपने काय केलं, राम मंदिर बांधता येत नसेल तर स्पष्ट सांगा- उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
– मुंबईत उत्तर भारतीयांमध्ये भीतीच वातावरण नाही- उद्धव ठाकरे
– हिंदू मार खाणार नाही आणि गप्पही बसणार नाही- उद्धव ठाकरे
– राम मंदिर झालं नाही तर सरकार बनणार नाही- उद्धव ठाकरे
– रामजन्मभूमीवर वेगळा अनूभव आला, रामाचे दर्शन घेतल्यानंतर चैतन्याची अनुभूती- उद्धव ठाकरे
– राम मंदिरासाठी अध्यादेश आणा, राम मंदिर लवकर बनवा, हिंदूंच्या भावनांशी खेळू नका- उद्धव ठाकरे
– अयोध्यायेत येण्यासाठी माझा कुठलाही छुपा अजेंडा नाही- उद्धव ठाकरे
– उद्धव ठाकरेंनी अयोध्यावासीयांचे आभार मानले
– रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू
9.30 AM उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह रामलल्लांच दर्शन घेतलं
5.40 PM शरयू नदीच्या काठावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते जलपूजनाला सुरुवात
5.40 PM शरयू नदीकाठी महाआरतीसाठी जय्यत तयारी
5.00 PM – अयोध्येला गेलेले शिवसैनिक आजच परतणार, सभेला परवानगी नाकारल्याने शिवसैनिक परतणार, उद्या केवळ उद्धव ठाकरे आणि निवडक नेतेच राम लल्लांचं दर्शन घेणार
4.35. PM – अयोध्येत राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा, वचनपूर्ती करणं हेच खरं हिंदूत्व – उद्धव ठाकरे ,
पहिल्यांदा अयोध्येत आलोय, इथून पुढेही येत राहणार
4.15 PM – उद्धव ठाकरेंनी अयोध्येत चांदीची वीट आणली
3.45 PM – ठाकरे कुटुंबीयांकडून श्री गणेशाची पूजा
3.31 PM – उद्धव ठाकरे लक्ष्मण किल्ल्यावर दाखल, शिवसैनिकांचा जल्लोष
3.05 PM: उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलवरुन लक्ष्मण किल्ल्याकडे रवाना
2.02 PM – आदित्य ठाकरे यांचं ट्विट – अयोध्या नगरी में उद्धव ठाकरे जी के साथ!! जय श्री राम!
अयोध्या नगरी में उद्धव ठाकरे जी के साथ!! जय श्री राम! pic.twitter.com/z3IEIDYEPt
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 24, 2018
1.45 PM उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल, विमानतळावरुन कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी खास बुलेट प्रूफ गाडी, केवळ ठाकरे कुटुंबच या गाडीत बसणार, गाडीत केवळ उद्धव, आदित्य आणि रश्मी ठाकरे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसुद्धा वेगळ्या गाडीत
1.29 PM – उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर पोहोचले
#अयोध्या LIVE: उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल pic.twitter.com/uKLFma2YoI
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2018
1.15 PM – अयोध्येत बंदुका हातात घेऊन शिवसैनिकांच्या घोषणा, कडेकोट बंदोबस्तातही शिवसैनिकांच्या हाती बंदुका. बंदुका दाखवत शिवसैनिकांच्या घोषणा
1.01 PM – तासाभरात उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचणार
12.05 PM : ठाकरे कुटुंबीयांना यश मिळो, उद्धव ठाकरे चांगलं पाऊल टाकत आहेत, हिंदुत्त्वाच्या बाजूने जे येतील त्यांना सोबत घेऊ : मनोहर जोशी एक्स्क्लुझिव्ह
11.50 AM : पुणे – जय श्री रामचा नारा देत पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग राम मंदीरात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाआरती संपन्न, अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा संकल्प, राम मंदिरात नैवेद्य म्हणून खास ‘श्रीराम’ अशी अक्षरं लिहिलेले पेढे वाटले
11.45 AM : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्येतील शरयू नदीकिनाऱ्याचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे आज शरयू किनारी महाआरतीला उपस्थित राहणार आहेत.
11.00 AM – उद्धव ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवरुन अयोध्येकडे रवाना, सांताक्रूझ विमानतळावर दाखल
10.10 AM :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीवरुन निघणार, विशेष विमानाने सहकुटुंब अयोध्येला रवाना होणार
संजय राऊत यांचा हल्लाबोल
आमच्या लोकांनी 1992 साली बाबरी पाडली ती काय नौटंकी होती का ? शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर खासदार संजय राऊत यांची टीका.
अयोध्येत सैन्य पाठवा या अखिलेश यादव यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला – अयोध्येत पाकिस्तानचे सैन्य पाठवणार का? आम्ही दुष्मन आहे का? आमच्या वारकरी, शिवसैनिकांवर गोळ्या झाडणार का? सैन्याची गरज देशाच्या सीमेवर आहे इथे अयोध्येत नाही.
– आज सामनामध्ये मी कोणाचं नाव घेतलं नाही. जे इतके वर्ष मंदिर न बांधता झोपले आहेत त्यांना मी कुंभकर्ण म्हटले आहे. – जे म्हणतात आम्ही राजकारण करतो त्यांना माझा प्रश्न आहे आम्ही जेव्हा बाबरी पाडली तेव्हा ही लोकं पळून गेली होती ते काय होतं?
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा
अयोध्येत सुरक्षेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे. 7 IPS अधिकारी संपूर्ण सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 1 अतिरिक्त पोलीस महासंचालक, 1 पोलिस उपमहानिरीक्षक, 3 एसएसपी, 10 पोलीस सहाय्यक अधीक्षक, 21 पोलीस उपअधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल, 42 पीएस कंपनी, 5 रॅपिड अक्शन फोर्स, एटीएस कमांडो, ड्रोन कॅमेरे हा सर्व लवाजमा अयोध्येत तैनात आहे.
उद्धव ठाकरे यांचा दौरा
– उद्धव ठाकरे आज दुपारी खासगी विमानाने अयोध्येत पोहोचतील. तिथे विमानतळावर त्यांचं स्वागत होईल
– दुपारी तीनच्या सुमारास अयोध्येतील लक्ष्मण किला इथं आज संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे.
– उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता शरयू घाटावर आरती करतील
– दुसऱ्या दिवशी 25 तारखेला रामजन्मभूमीला पूजा करतील
या ऐतिहासिक दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक स्पेशल ट्रेनद्वारे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही पदाधिकारी विमानातूनही अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत देखील शिवसेनेने जोरदार तयारी केली असून महाराष्ट्रातही शिवसैनिकांमध्ये अयोध्या दौऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स
अयोध्येत पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्त्यानेही त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण आली नसल्याचं शिवसैनिकांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर सांगितलं. अयोध्येतील मंदिर परिसरातील धर्मशाळा आणि इतर ठिकाणी शिवसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार
दरम्यान, ट्रेन जाणिवपूर्वक लेट केली जात असल्याचा आरोप रेल्वेकडून फेटाळण्यात आला आहे. विशेष ट्रेनचं वेळापत्रक नेहमीच मागेपुढे होत असतं असं रेल्वेचं म्हणणं आहे. नाशिकहून निघालेल्या विशेष ट्रेनने अयोध्येत 36 तासात पोहोचणं अपेक्षित होतं. पण यापेक्षाही जास्त उशिरा झाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं.
प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीवर
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर आणि चॅनलवर पाहता येणार आहे. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी मुंबईपासून ते अयोध्येपर्यंतची प्रत्येक अपडेट प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत पोहोचवणार आहेत. लाईव्ह अपडेटसाठी टीव्ही 9 मराठीला @tv9marathi या नावाने ट्विटर आणि फेसबुकला फॉलो करु शकता. तसंच लाईव्ह टीव्हीसाठी https://www.tv9marathi.com/live-tv लॉग ऑन करा.
उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल?
शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी अयोध्येत पोहोचतील. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली होती.
अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होईल. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. ‘लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.
राम मंदिरासाठी अध्यादेश आणा : संजय राऊत
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी आणि रविवारी अयोध्येत असतील. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत अगोदरपासूनच अयोध्येत दौऱ्याची तयारी करत आहेत.
राम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आम्ही 17 मिनिटात बाबरी पाडली होती, तर अध्यादेश आणायला किती वेळ लागतो? राष्ट्रपती भवनापासून ते यूपीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यसभेतही अनेक असे खासदार आहेत, जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील. जो विरोध करेन, त्याचं देशात फिरणं मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या
अयोध्या दौरा – मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची ट्रेन अयोध्येत दाखल
व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार
‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स