आयोध्या : संपूर्ण देशाचं लक्ष आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे आहे. कधी एकदा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि रामलल्लाचं दर्शन घेता येईल या प्रतीक्षेत देशभरातले रामभक्त आहेत. या सर्व रामभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आयोध्येतलं राम मंदिर भाविकांसाठी कधी खुलं केलं जाणार याची तारीख समोर आली आहे. (Date of Actual Shri Ram Darshan in Ayodhya Announced)
यासोबतच श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने रामभक्तांसाठी आणखी खास सुविधा उलपब्ध केली जाणार आहे. राम मंदिराचं निर्माण ‘याची देही याची डोळा’ पाहता यावा यासाठी एक व्ह्यू पॉईंट उभारण्यात येणार आहे. जिथून राम मंदिराचं सर्व निर्माण रामभक्तांना पाहाता येईल. आयोध्येत येणारे सर्व भक्त मंदिर निर्माणाचं कार्य पाहू शकतील. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रमार्फत संपूर्ण देशातून मंदिर निर्माणासाठी निधी संकलन सुरू आहे. राम मंदिर निर्माण समिति आपल्या कार्यात पूर्णपणे झोकून काम करत आहे.
गेल्यावर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं होतं. या भूमिपूजनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं आयोध्येत विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. ट्रस्टकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे.