Alcolhol Budget 2021: मोदी सरकारनं मद्यप्रेमींचं ‘बसणं’ महाग केलं? वाचा दारु, बिअर महागणार की स्वस्त?

आतापर्यंत मद्यावर 150 टक्के सेस लागत होता. मोदी सरकारने हा कर 100 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. | Alcolhol Budget 2021

Alcolhol Budget 2021: मोदी सरकारनं मद्यप्रेमींचं 'बसणं' महाग केलं? वाचा दारु, बिअर महागणार की स्वस्त?
दारुबंदी
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:53 PM

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union budget 2021) संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामण यांनी मद्यावर 100 टक्के कृषी अधिभार (सेस) लावण्याची घोषणा केली.  आतापर्यंत मद्यावर 150 टक्के कर (Duty) आकारण्यात येत होता. मोदी सरकारने हा कर 50 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे खरंतर दारु स्वस्त झाली पाहिजे होती. मात्र, मोदी सरकारने 100 टक्क्यांच्या ड्युटीऐवजी 100 टक्क्यांचा कृषी सेस लावला. त्यामुळे मद्यावरील कर कमी होऊनही ग्राहकांना कोणता दिलासा मिळणार नाही. कृषी सेसमुळे मद्याच्या किंमती स्वस्त होण्याऐवजी स्थिरच राहतील. (Alcohol price remain unchanged after Union budget 2021)

मद्यावर कृषी सेस लावल्यास काय परिणाम होणार?

मद्य आणि संबंधित उत्पादनांवर 100 टक्के कृषी सेस लागू केल्याने आता हे सर्व पैसे केंद्र सरकारच्या हातात जाणार आहेत. यापूर्वी मद्यावर 150 टक्के कर असला तरी तो थेट केंद्र सरकारच्या हातामध्ये जात नव्हता. त्याची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी होत होती. मात्र, नव्या निर्णयामुळे हा कर थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होईल.

पेट्रोल आणि डिझेलवरही सेस

मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार (Cess tax) लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोलवर 2.5 रुपयांचा तर डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस लागणार आहे. त्यामुळे शंभरीनजीक येऊन ठेपलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी आणि स्पेशल एक्साईज ड्युटी दे दोन कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर वाढीव सेसचा काही परिणाम होणार नाही, असेही सांगितले जात आहे.

गॅसचे दर बदलणार

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तसेच व्यवसायिक स्तरावरील गॅस वापराचे दर बदलतात. आजही गॅसचे नवीन दर जाहीर झालेत. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये गॅसदरांमध्ये काही बदल करण्यात आले नव्हते, तसेच, या महिन्यातही घरगुती गॅसच्या दरांमध्ये बदल झालेले नाहीत. नवी दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 694 रुपये, तर मुंबईत 720.50 रुपये इतकी असेल

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

(Alcohol price remain unchanged after Union budget 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.